Join us

गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 13:16 IST

सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे पहिल्यांदाच चित्रपटात एकत्र आले आहेत. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी दिग्दर्शित इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी या चित्रपटात या योग जुळून आला असून, त्यांच्या अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात रंगणार आहे.फटमार फिल्म्स एलएलपी या निर्मिती संस्थेकडून इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीची निर्मिती करण्यात येत आहे. पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर हा चित्रपट बेतला आहे. प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं आहे.

अनेक मातब्बर कलाकारांचा चित्रपटात समावेश आहे. त्यात गिरीश कुलकर्णी आणि सयाजी शिंदे यांचाही समावेश आहे. हे दोन्ही अभिनेते अतिशय महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अातापर्यंत कधीच हाताळला न गेलेला विषय या इन्स्ट्टियूट ऑफ पावटॉलॉजीमध्ये मांडण्य़ात आला आहे. 'सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसह काम करायला मिळणं ही आमच्यासाठी मोठी संधी आहे.

 

आतापर्यंत या दोन्ही अभिनेत्यांनी केलेलं काम पाहिलं अाहे. त्यामुळे इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजीतील भूमिकांसाठी सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी महत्त्वाचे आहेत. त्यांच्या अभिनयाची क्षमता मोठी आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाहीच.पण या निमित्ताने प्रेक्षकांना अभिनयाची जुगलबंदी पाहायला मिळेल, असं सागर वंजारी आणि प्रसाद नामजोशी यांनी सांगितलं.