Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेशीमगाठीत अडकण्याआधी प्रार्थना बेहरेच्या मनात काय सुुरु आहे,जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 12:53 IST

'आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई' म्हणत अभिनेत्री  प्रार्थना बेहरेचे लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या ...

'आली लग्न घटिका समीप, करा हो लगीनघाई' म्हणत अभिनेत्री  प्रार्थना बेहरेचे लग्नासाठी काऊंटडाऊन  सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या लग्नाच्या तयारीत बिझी असली तरीही प्रार्थना तिच्या मनात दडलेल्या भावनांना वाट मोकळी करून देत आहे. प्रार्थना तशी सोशल मीडियावर खूप अॅक्टीव्ह असते. लग्न ठरल्यापासून ते लग्नाच्या सगळ्या घडामोडी ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. प्रत्येक मुलीसाठी लग्न हा तिच्या आयुष्यातला मेगा एव्हेंट असतो. लग्नानंतर आयुष्यात येणा-या जोडीदारासह ती तिच्या आयुष्याची नव्याने सुरूवात करणार असते.लग्नाआधी प्रत्येक मुलीची अवस्था ही शब्दात व्यक्त न करता येणारी अशीच असते. वेगवेगळ्या प्रश्नांनी होणा-या नवरीच्या मनात काहुर माजलेला असतो अशीच काहीशी अवस्था आता प्रार्थनाची झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळेच तिने आपली भावना मनात न ठेवता सोशल मीडियावर शेअर करत आहे. सोशल मीडियावर #gettingmarriedsoon च्या माध्यमातून प्रार्थना फोटो शेअर करत आहे. तिचे अनेक चाहते या फोटोंना लाईक्स कमेंट करत येणा-या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत.  दिग्दर्शक अभिषेक जावकरसह 14 नोव्हेंबर 2017 ती लग्नबंधनात अडकणार आहे. त्यामुळे लग्नाला खूप कमी दिवस उरले आहेत. लग्नानंतर प्रार्थना बेहरेचा नवीन प्रवास सुरू होणार असल्यामुळे ती खूप उत्सुकही आहे. प्रार्थनाचे हे अरेंज मॅरेज असून ऑगस्टमध्ये तिने अभिषेकसह साखरपुडा केला होता. विशेष म्हणजे प्रार्थना आणि अभिषेक गोव्यात डेस्टीनेशन वेडींग करणार आहे. तिच्या लग्नासाठी तिच्या चित्रपटसृष्टीतील मित्र मैत्रिणींनीही जोरदार तयारी केल्याचे समजतंय. अभिषेक हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. डब्बा एैस पैस, सॉल्ट आणि प्रेम यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे. प्रार्थनाने साखरपुड्याचा फोटो पोस्ट केला आहे. आम्ही दोघांनी आयुष्यभर एकत्र राहायचे ठरवले आहे असे कॅप्शनही देत एंगेज झाल्याची बातमीही सोशल मीडियावरच दिली होती. प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. यानंतर 'मितवा', 'कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर एंड मिसेस सदाचारी' या सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. यामुळं तिच्यावर पुरस्कारांचाही वर्षाव झाला. मालिका आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांवर जादू केलीच आहे.