Join us

Get Well Soon: ही अभिनेत्री लवकरच बरी होऊन परतणार, मेसेज देऊन मानले चाहत्यांचेही आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 14:54 IST

अभिनेत्री श्रृती मराठेचाही असाच एक ड्रीम रोल आहे. श्रृतीला भविष्यात रानी मुखर्जीने साकारलेला ब्लॅक सिनेमातील रोल करण्याची इच्छा आहे.

श्रृती मराठेने तिचा विनामेकअप लूक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच चाहते तिची काळजीने विचारपुस करताना दिसतायेत. तिला काळजी घेण्यासाठी सांगतायेत. यावरून ती गेल्या काही दिवसांपासून खूप आजारी असल्याचे समजतंय. तिला नेमके काय झाले आहे हे स्पष्ट झाले नसले तरी तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती सध्या विश्रांती घेत आहे.

शेअर केलेल्या फोटोत श्रृती खूप अशक्त झाल्याचे जाणवत आहे. पूर्वीसारखे एनर्जेटीक श्रती दिसत नसल्यामुळे तिचे चाहतेही संभ्रमात पडले आहेत. तसेच लवकरच मी पुन्हा बरी होणार असून तुमच्या सर्वांचे प्रेम असेच राहू द्या असे तिने कॅप्शनही दिले आहे. तुर्तास श्रृती तिच्या आजापणातून सावरत आहे. तसेच तिच्या चाहत्यांनाही काळजी करण्याचे कारण नसून सगळे काही ऑल इज वेल असल्याचे तिने म्हटले आहे.

प्रत्येक कलाकाराची त्याच्या अभिनय कारकिर्दीत वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याची इच्छा असते. या भूमिकेद्वारे आपलं वेगळेपण सिद्ध व्हावं आणि कलाकार म्हणून असलेले गुण समोर यावे अशी प्रत्येक कलाकाराला वाटतं. त्यामुळे प्रत्येकाचा कोणता ना कोणता ड्रीम रोल असतो. अभिनेत्री श्रृती मराठेचाही असाच एक ड्रीम रोल आहे. श्रृतीला भविष्यात रानी मुखर्जीने साकारलेला ब्लॅक सिनेमातील रोल करण्याची इच्छा आहे. रानीने साकारलेली ही भूमिका श्रृतीला भावली होती. त्यामुळे अशी भूमिका साकारण्याचं स्वप्न आहे असं श्रृतीने म्हटलं आहे. याशिवाय अभिनेत्री नसती तर एअर होस्टेस झाले असते असे श्रृतीने म्हटले आहे. त्यानिमित्ताने जग फिरता आले असते असं तिने सांगितले आहे.

टॅग्स :श्रुती मराठे