Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी नाट्यगौरव पुरस्काराच्या नामांकनात स्थान मिळवण्यासाठी अशी करा नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2017 17:49 IST

नाटक म्हणजे मराठी माणसाचा श्वास आहे. आपली मराठी रंगभूमी सर्वार्थाने समृद्ध आहे. ही रंगभूमी ही अनेक कलाकारांसाठी खास असते. ...

नाटक म्हणजे मराठी माणसाचा श्वास आहे. आपली मराठी रंगभूमी सर्वार्थाने समृद्ध आहे. ही रंगभूमी ही अनेक कलाकारांसाठी खास असते. एखाद्या संवादाला पुढच्याच क्षणी मिळणारी रसिकांची टाळी ऐकणे ही तर रंगभूमीवरच्या कलाकारासाठी पावतीच. टीव्ही, सिनेमा या माध्यमांसोबत रंगभूमीवर एक तरी नाटक करावे हे वेड नसलेला कलावंत विरळच. अशा नाट्यकर्मींचा, नाट्यसंस्थांचा गौरव करण्यासाठी झी मराठी वाहिनी गेल्या अनेक वर्षांपासून कौतुकसोहळा आयोजित करते. यंदाही या नाट्यगौरव सोहळ्याचे वेध तमाम रंगकर्मी आणि नाट्यवर्तुळाला लागले आहेत. झी नाट्यगौरव पुरस्काराचा तो नेत्रदीपक सोहळा, नव्या नाटकांमधील विषयांचे वैविध्य, प्रयोग, दिग्दर्शकांची कमाल आणि प्रचंड उत्सुकतेनंतर मिळणारा उत्कृष्टतेचा मुकूट हे सगळचं अनोखं.झी नाट्यगौरव पुरस्काराच्या नामांकन यादीत स्थान मिळवण्यासाठी यंदा चांगलीच चुरस आहे. यावर्षीचे मुख्य आकर्षण म्हणजे सर्वोकृष्ट प्रायोगिक नाटकाला झी मराठीतर्फे एक लाखाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. झी मराठी नेहमीच मराठी नाटकांना प्रोत्साहन देत आली आहे. या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांसाठी एक लाखाचे पहिले पारितोषिक नक्कीच आणखी मेहनत घेण्याचे कारण ठरेल. यावर्षी या स्पर्धेला ऑनलाइन टच असणार आहे. या पुरस्कारासाठी नोंदणी करण्याची मुदत १० डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत आहे. नावनोंदणीसाठी http://www.zeemarathi.com/zgp2018 या लिंकवर अर्ज उपलब्ध आहेत. ऑनलाइन नोंदणी केलेल्या अर्जांचाच विचार केला जाणार आहे. यावर्षी रंगभूमीवर आलेल्या नाट्यसंस्थांचा सहभाग या स्पर्धेत असेल. नाट्यसृष्टीतील तज्ज्ञ आणि अभ्यासू परीक्षकांकडून झी नाट्यगौरव पुरस्कारासाठी विविध विभागातील नामांकने आणि विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. यासंदर्भातील नियम आणि अटी वेबसाइटवर आहेत.झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा गेली अनेक वर्षं झी मराठी वाहिनी पार पाडत आहे. या पुरस्कार सोहळ्याची उत्सुकता वर्षभर रसिक आणि चित्रपट, नाट्यसृष्टीतील लोकांना लागलेली असते. यंदाच्या वर्षी देखील झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळा भव्य असून या सोहळ्याची तयारी सध्या जोरात सुरू आहे. आता कोणती नाटकं, कलाकार या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार पटकवतात हे आपल्याला लवकरच कळेल.