Join us

"मी इतका भाग्यवान की देवाने...", जिनिलियाच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट, म्हणाला- "बायको..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:06 IST

जिनिलियाच्या वाढदिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अभिनेता आणि पती रितेश देशमुखने पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत जिनिलियाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी जिनिलिया देशमुखचा आज वाढदिवस आहे. जिनिलियाच्या वाढदिवशी तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तर अभिनेता आणि पती रितेश देशमुखने पत्नीच्या वाढदिवशी खास पोस्ट शेअर करत जिनिलियाबद्दलचं प्रेम व्यक्त केलं आहे. 

जिनिलियाच्या वाढदिवशी रितेशची पोस्ट

हॅपी बर्थडे बायको, माय लव्ह...

आज तुझा फक्त वाढदिवस नाही तर... माझ्यासाठी हा दिवस आठवण करून देणारा आहे की मी किती भाग्यवान आहे. तुझ्यासोबत माझं आयुष्य जगतोय. तू एक अशी उत्तम स्त्री आहेस जिच्याकडे खूप गोष्टी आहेत. जेव्हा हसण्याची इच्छा नसते तेव्हाही तू मला हसवतेस. आपल्या मुलांसाठी तुझ्यापेक्षा चांगली आई असूच शकत नाही. एक मुलगी जी प्रेम आणि आदराने नेतृत्व करते आणि एक मैत्रीण जी नेहमीच सोबत असते. 

कल्पना करता येणार नाही इतक्या गोष्टी तू करतेस आणि तरीही तुझ्या भोवती असणाऱ्या प्रत्येकाला तू खूप काही देतेस. कुटुंबातील आनंदाचे कित्येक क्षण तुझ्यामुळे मिळाले. जरी तू खूप थकलेली असलीस, कोणाच्या लक्षातही येत नसेल.. पण तू आम्हाला सगळ्यांना एकत्र बांधून ठेवणारा धागा आहेस. 

तुझ्या चिडवण्याने, मित्रांसोबत ज्या गोष्टी शेअर करतेस आणि तुझं न संपणार हास्य... मला लाज आणण्याची एकही संधी सोडत नाहीस. पण, तरीही मी या गोष्टी बदलणार नाही. कारण या सगळ्यात तू नेहमीच माझ्या पाठीशी आहेस. तू मला प्रोत्साहन देणारी, कायम माझी बाजू घेणारी आणि जिच्यावर मी विश्वास टाकू शकतो अशी एकमेव व्यक्ती आहेस. 

तू माझा आधार आहेस. आयुष्यातील गोंधळात तू माझी फेव्हरेट सहकारी आहेस. तू माझ्या घराचं हृदय आहेस. आपली मुलं सगळ्यात आधी तुझ्याकडे येतात. आज आम्ही तुला सेलिब्रेट करू. आनंद, प्रेम, हास्य, विश्रांती आणि कदाचित शांत सुखाची झोप या सगळ्यासाठी तू पात्र आहेस. 

एक उत्तम व्यक्ती होण्यासाठी तू मला प्रेरणा दिली आहेस. तुझ्यासारखा लाइफ पार्टनर मिळणं हे माझं भाग्य. मी इतका आनंदी आहे की माझे आशीर्वाद मोजत आहे आणि देवाने माझ्यावर कृपा केली आहे. 

मी तुझ्यावर खूप प्रेम करतो माझी बायको...इतकं की मी ते शब्दांत नाही मांडू शकत. पण, आयुष्यभर मी ते दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. 

हॅपी बर्थडे लव्ह 

दरम्यान, जिनिलिया आणि रितेशने २०१२मध्ये लग्न करत संसार थाटला. लग्नाआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. त्यांना दोन मुलंही आहेत. जिनिलिया आणि रितेश हे महाराष्ट्राचे लाडके दादा वहिनी आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणूनही पाहिलं जातं. 

टॅग्स :जेनेलिया डिसूजारितेश देशमुख