Join us
Daily Top 2Weekly Top 5

“माझी बायको...”, रितेश देशमुखने जिनिलीयासाठी केलेल्या पोस्टने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 13:59 IST

Genelia Deshmukh Birthday : लाडक्या पत्नीसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला...

रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख हे कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. त्यांच्या जोडीचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलियाकडे सिनेसृष्टीतील आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. देशमुख घराण्याची सून झालेल्या आणि महाराष्ट्राची लाडकी वहिनी असलेल्या जिनिलियाचा आज वाढदिवस आहे. पत्नीच्या वाढदिवशी रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन खास फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

“माझी बेस्ट फ्रेंड, मला पाठिंबा देणारी, माझी टीकाकार, प्रोत्साहन देणारी, माझं आयुष्य...माझं सर्वकाही...तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. नेहमी मला साथ देण्यासाठी आणि माझं आयुष्य समर्थ करण्यासाठी थँक्यू...माझी बायको...माझं वेड...खूप सारं प्रेम,” असं रितेशने पोस्टमध्ये म्हटलं आहे. रितेशने जिनिलियासाठी केलेल्या खास पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनी कमेंट करत जिनिलियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

"तुमचा बिअर बार आहे का?", समीर वानखेडेंनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले, "डान्स बार..."

रितेश आणि जिनिलियाने अनेक सिनेमांत एकत्र काम केलं आहे. २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘तुझे मेरी कसम’ चित्रपटाच्या सेटवर रितेश-जिनिलियाची पहिली भेट झाली होती. त्यानंतर ‘तेरे नाल लव्ह हो गया’ या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं. डिसेंबर महिन्यात प्रदर्शित झालेल्या वेड चित्रपटातून पुन्हा एकदा रितेश-जिनिलियाची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

विजय देवराकोंडाबरोबर डेटिंगच्या चर्चा दरम्यान रश्मिका मंदानाचा मोठा खुलासा, म्हणाली, "माझं लग्न..."

अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर रितेश आणि जिनिलियाने २०१२ साली विवाहबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर जिनिलिया रुपेरी पडद्यापासून दूर होती. ‘वेड’मधून तिने पुन्हा कमबॅक करत मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. रितेश आणि जिनिलियाला दोन मुलं आहेत.

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजामराठी अभिनेता