Join us

जिनिलीयाने विचारलं "लग्न म्हणजे काय?", रितेश म्हणाला- "लग्न म्हणजे घोड्यावर बसून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 15:41 IST

महाराष्ट्राचे हे लाडके दादा वहिनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक मजेशीर रील व्हिडिओदेखील ते दोघे शेअर करत असतात. सध्या जिनिलीया आणि रितेशच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहे. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्राचे हे लाडके दादा वहिनी सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. अनेक मजेशीर रील व्हिडिओदेखील ते दोघे शेअर करत असतात. सध्या जिनिलीया आणि रितेशच्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये जिनिलीया त्याला विचारते, "अहो, लग्न म्हणजे काय?". त्यावर रितेशने असं काही उत्तर दिलं की जिनिलीयाही त्याच्याकडे पाहतच राहिली. रितेश म्हणाला, "लग्न म्हणजे घोड्यावर बसून केलेला गाढवपणा". रितेश-जिनिलीयाचा हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

रितेश-जिनिलीयाची लव्हस्टोरीही खूप खास आहे. अनेक वर्ष डेट केल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. २०१२ साली रितेश आणि जिनिलीयाने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. त्यांना दोन मुलं आहेत. 

टॅग्स :रितेश देशमुखजेनेलिया डिसूजासेलिब्रिटी