Join us  

Gautami Patil : कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करणारा ताब्यात, गौतमी म्हणाली, "अजून बरेच..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 9:49 AM

पुणे पोलिसांनी कालच एका अल्पवयीन मुलाला अहमदनगरमधून ताब्यात घेतले.

सध्या गावोगावी जिची चर्चा आहे ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला होता. तिच्या कार्यक्रमानंतर ती कपडे बदलत असताना काही जणांनी हा खोडसाळपणा तेला आणि तो व्हिडिओ व्हायरल केला. याप्रकरणी पुणे पोलिसांनी कालच एका अल्पवयीन मुलाला अहमदनगरमधून ताब्यात घेतले. यावर आता गौतमीने प्रतिक्रिया दिली आहे.

गौतमी पाटील सुरुवातील तिच्या अश्लील डान्समुळे चर्चेत आली होती. तिच्यावर सगळीकडूनच टीका झाली. यानंतर तिने जाहीर माफी मागत सुधारणा करणार असल्याचं सांगितलं. मात्र गौतमीचा डान्स हा लावणी अजिबातच नाही असंच स्पष्ट मत अनेकांनी व्यक्त केलं. तरी तिची क्रेझ मात्र वाढतच आहे. गावोगावी तिचा डान्स पाहण्यासाठी गर्दी होते. दरम्यान अशाच एका कार्यक्रमानंतर गौतमीसोबत हा भयावह प्रसंग घडला. तिचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ गपचूप काढला गेला. त्या विकृत आरोपीला आता ताब्यात घेण्यात आलंय.

काल गौतमीचा श्रीगोंदा येथे कार्यक्रम पार पडला. यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना ती म्हणाली,"चांगली गोष्ट आहे. एक जण सापडलाय. अजून काही आहेत ते सुद्धा लवकरच पोलिसांच्या हाती लागतील. मला आता चांगलं वाटतंय."

गौतमीची वाढती क्रेझ बघता तिची मराठी चित्रपटातही वर्णी लागली. तिचा 'घुंगरु' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झालाय. सगळ्यांनी सिनेमा पाहावा असं सुद्धा गौतमी माध्यमांना म्हणाली.

 

टॅग्स :गौतमी पाटीलपोलिससोशल मीडियासोशल व्हायरल