Join us

​गौरी नलावडे आणि रिचा अग्निहोत्री झळकणार वेब सिरिजमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2017 09:58 IST

कहानी घर घर की, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांरसाख्या मालिकांचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. ...

कहानी घर घर की, कुसूम, क्योंकी साँस भी कभी बहू थी यांरसाख्या मालिकांचे दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे. ढोलकीच्या तालावर हा त्यांचा मराठी कार्यक्रम तर प्रंचड गाजला होता. हिंदी आणि मराठी मालिकांचे दिग्दर्शन केल्यानंतर संतोष कोल्हे आता एक वेगळ्या क्षेत्रात आपले भाग्य आजमावरणार आहेत. ते आता वेब सिरिजचे दिग्दर्शन करणार आहेत. व्हायरस मराठी हे यू ट्युब चॅनल सुरू होत असून त्यावर ऑसम टूसम ही ट्रॅव्हल वेब सिरिज दाखवली जाणार आहे. अभिनेत्री गौरी नलावडे आणि नृत्यांगना रिचा अग्निहोत्री या दोघी बॅग पॅक करून फिरायला निघाल्या असून महाराष्ट्रातल्या गूढ, अगम्य जागा प्रेक्षकांना दाखवणार आहेत. या शो ची संकल्पना आणि दिग्दर्शन संतोष कोल्हे यांनी केले आहे.अनेकजण महाराष्ट्रातल्या नवनवीन ठिकाणांना नेहमीच भेटी देत असतात. पण आडवाटेवरचा महाराष्ट्र या वेबसिरिजमध्ये दाखवला जाणार आहे. भटकंती मालिका करत असतानाच हा गूढ अगम्य आणि नैसर्गिक आश्चर्याने नटलेला महाराष्ट्र फिरायचा अशी कल्पना होती, असे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी सांगितले. द फिल्म क्लिक आणि कनेक्ट फिल्म्स या संस्थांनी या वेब चॅनलची निर्मिती केली आहे.मराठी मनोरंजन क्षेत्रात व्हलगर, बोल्ड, शिवीगाळ अशा आशयाचा कंटेन्ट न देता, माणसाच्या जगण्यातल्या रोजच्या आयुष्यातल्या घडामोडींवर बेतलेल्या सिरियस मालिका या चॅनलवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.गौरी नलावडेने स्वप्नांच्या पलीकडे या मालिकेमुळे नावारूपाला आली. त्यानंतर तिने फ्रेंड्स, कान्हा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. तसेच अॅब्स्युलेट या नाटकात गौरी झळकली होती. आता ती वेब सिरिजमध्ये काम करणार आहे.