Join us

"मला मुलगी मानलं, करिअरसाठी...", महेश मांजरेकरांबद्दल मानसकन्या गौरी इंगावलेची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 16:01 IST

पप्पांनी माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी..., गौरी इंगावले काय म्हणाली?

'कुणीतरी आहे तिथे' हे नाटक लवकरच येत आहे. अभिनेत्री गौरी इंगावले यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. गेल्या वर्षी गौरी 'ही अनोखी गाठ'मध्ये दिसली होती. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची ती मानसकन्या आहे. त्यांनीच तिला अभिनय क्षेत्रात आणलं. 'दे धक्का २'मध्येही ती होती. महेश मांजरेकरांनी तिच्यातलं टॅलेंट कसं ओळखलं त्यामागची कहाणी नक्की काय हे नुकतंच गौरीने एका मुलाखतीत सांगितलं आहे.

'अल्ट्रा मराठी बझ'ला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकरांबद्दल गौरी म्हणाली, "पप्पांनी माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी त्यांची कायम आभारी आहे. त्यांनी मला साताऱ्यावरुन इथे करिअरसाठी आणलं. मला मुलगी मानलं. १३ वर्ष झाली मी त्यांच्याबरोबर आहे. त्यामुळे मी या संपूर्ण कुटुंबासाचीच खूप आभारी आहे."

नाटकाबद्दल ती पुढे म्हणाली, "पप्पांनी मला विचारलं की हे नाटक करायला आवडेल का तेव्हा मी म्हणाले नक्कीच..का नाही? मला मजा येईल. मी काहीही नवीन करत असेल तर घरीही सगळेच उत्साहित असतात. मी घरी जाऊन सगळ्यांशी बोलते, माझ्या शंकाही विचारते. सगळेच मला मदत करतात."गौरीने गेल्या वर्षी तिच्या खऱ्या कुटुंबासोबतचे फोटोही पोस्ट केले होते. गावी त्यांनी नवीन घर घेतलं होतं. याची झलक तिने सोशल मीडियावर दाखवली होती. 

गौरी आता 'वेडात मराठे वीर दौडले सात' या महेश मांजरेकर यांच्या सिनेमातही दिसणार आहे. गौरीला एक सख्खी बहीण आहे जिचं नाव गार्गी कुलकर्णी आहे. ती जिम्नॅस्टिक्स करते. तिचीही झलक या व्हिडिओत दिसते. याशिवाय गौरीचा सत्या, सई  या महेश मांजकेरकर यांच्या मुलांसोबतही चांगला बॉंड आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gauri Ingawale grateful to Mahesh Manjrekar for career and support.

Web Summary : Gauri Ingawale expresses gratitude to Mahesh Manjrekar for bringing her to Mumbai, supporting her career, and treating her like a daughter. She's acting in his play and upcoming movie, feeling supported by his entire family, and appreciates his mentorship.
टॅग्स :महेश मांजरेकर मराठी अभिनेता