गौरव घाटणेकर 'काय रे रास्कला' या चित्रपटात मुख्य भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2017 16:28 IST
तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज ...
गौरव घाटणेकर 'काय रे रास्कला' या चित्रपटात मुख्य भूमिकेत
तुझविन सख्या रे या मालिकेतून अभिनेता गौरव घाटणेकर याने प्रेक्षकांचे मनं जिंकले आहे. या मालिकेतील त्याची भूमिका ही आज प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याची भूमिका पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकदेखील उत्सुक आहेत. म्हणून गौरवच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. तो लवकरच एका आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. का रे रास्कला असे या चित्रपटाचे नाव आहे. बॉलिवुडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा निर्मित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाविषयी गौरव घाटणेकर सांगतो, या चित्रपटात मी रास्कलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण सध्या कोल्हापूर आणि सोलापूर येथे सुरू आहेत. या चित्रपटासाठी माझी निवड झाल्याने मी खूपच आनंदी आहे. बॉलिवुड आणि हॉलिुवडची तगडी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाल्याने खूपच आनंद होत आहे. या चित्रपटात माझ्यासोबत भाग्यश्री लवटे झळकणार आहे. आता, काय रे रास्कला या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना महाराष्ट्र आणि दाक्षिणात्य संस्कृती पाहायला मिळणार आहे. कॉमेडीवर आधारित असणारा हा चित्रपट असल्याने प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेन असा विश्वास आहे. नुकतेच काय रे रास्कला या चित्रपटाचा मुहुर्त पार पडला, यावेळी मधु चोप्रा, दिग्दर्शक गिरीधरन स्वामी, कुनिका सदानंद आदि कलाकार उपस्थित होते. मात्र प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री प्रियंका चोप्रा स्वत: उपस्थित नव्हती. मात्र तिने या मुहुर्तावेळी व्हिडीयोद्वारे काय रे रास्कला च्या संपूर्ण टीम ला शुभेच्छा दिल्या आहेत. यापूर्वी प्रियांका चोप्राने नुकतेच व्हेंटिलेटर हा चित्रपट प्रदर्शित केला आहे. तिचा हा चित्रपटा मोठया प्रमाणावर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या चित्रपटात ती गायिकेची जबाबदारीदेखील पार पाडताना दिसली आहे. तिच्या या गाण्याने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.