Join us

​ आकाश ठोसर आणि अक्षय कुमार आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 13:00 IST

 सैराट बॉय आकाश ठोसर परशाची भूमिका साकारुन रातोरात स्टार झाला आणि आता त्याच्यासाठी  बॉलिवूडचे दरवाजे देखील उघडे झाल्याचे पाहायला ...

 सैराट बॉय आकाश ठोसर परशाची भूमिका साकारुन रातोरात स्टार झाला आणि आता त्याच्यासाठी  बॉलिवूडचे दरवाजे देखील उघडे झाल्याचे पाहायला मिळतेय. आकाश नुकताच अभिनेते महेश मांजरेकर यांच्यासोबत उमंग २०१७ या कार्यक्रमामध्ये बॉलिवूडच्या अनेक बडया कलाकारांच्या सोबत उपस्थित होता. अहो एवढेच नाही तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या पंकितीत जाऊन आकाश बसला होता. बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 'उमंग २०१७' चा धमाकेदार शो पार पडला. मुंबई पोलिसांच्या मदतीसाठी हा शो दरवर्षी आयोजित करण्यात येतो. रणवीर सिंग, अक्षय कुमार, जॅकी श्रॉफ, प्रिती झिंटा, अनुष्का शर्मासह 'सैराट'चा लोकप्रिय 'पर्शा' अर्थात आकाश ठोसरही यावेळी हजर होता.रणवीर सिंग संपूर्ण काळ्या कपड्यात वाढलेल्या दाढी मिशासह वेगळ्याच अवतारात हजर होता. हा त्याचा आगामी 'पद्मावती' चित्रपटासाठीचा लूक आहे. अनुष्का शर्मा काळ्या आणि लाल रंगाच्या साडीत दिसत होती.विशेष म्हणजे 'सैराट'चा अभिनेता आकाश ठोसरला बॉलिवूड अभिनेत्यांच्या पंक्तीत पाहायला मिळाले. अक्षय कुमार, संजय मांजरेकर यांच्यासोबत आकाश मांडीला मांडी लावून बसला होता. अक्षयने त्याच्याशी गप्पाही मारल्या.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्नी आणि मुलीसह हजर होते.