Join us
Daily Top 2Weekly Top 5

'देऊळ बंद २'ची झाली घोषणा; गश्मीर महाजनी म्हणाला, "मी त्यात नाहीए पण..."

By ऋचा वझे | Updated: April 16, 2025 16:05 IST

'देऊळ बंद २' मध्ये गश्मीर का नाही?

२०१५ साली आलेला 'देऊळ बंद' सिनेमा खूप गाजला होता. गश्मीर महाजनीने सिनेमात नासाचा वैज्ञानिक राघव शास्त्रीची भूमिका साकारली होती. देवालाच आव्हान देणाऱ्या राघवला नंतर कसा साक्षात्कार होतो अशी ती गोष्ट होती. प्रवीण तरडेंनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. त्याचवेळी देऊळ बंद २ चीही संकल्पना फायनल झाली होती. नुकतंच 'देऊळ बंद २' च्या शूटिंगला सुरुवात झाली आहे. यानिमित्ताने अभिनेता गश्मीर महाजनीने (Gashmeer Mahajani) यावर प्रतिक्रिया दिली आहे.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत गश्मीर महाजनी म्हणाला, " देऊळ बंद २ तेव्हाच लिहिला गेला होता. तो सिनेमा शेतकऱ्यांवर असणार आहे त्यामुळे त्यात राघव शास्त्री नासाचा सायंटिस्ट फिट बसत नाही. म्हणून मी सिनेमात दिसणार नाही. मात्र बाकी सगळी सिनेमाची टीम तीच आहे. माझी लाडकी टीम आहे. प्रवीण तरडे, निर्माते त्यांना सगळ्यांनाच माझ्याकडून भरमसाठ शुभेच्छा. सगळे छानच करतील त्यात काही शंका नाही."

गश्मीर महाजनीला 'देऊळ बंद'मुळेच लोकप्रियता मिळाली होती. 'देऊळ बंद २: आता परीक्षा देवाची' टायटलची घोषणा झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा संघर्ष दाखवण्यात येणार आहे. यामध्येही मोहन जोशी स्वामी समर्थांच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रवीण तरडेंन लॉकडाऊनमध्येच दुसऱ्या भागाची कथा लिहिली होती. पुढील वर्षी सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे

टॅग्स :गश्मिर महाजनीमराठी अभिनेतामराठी चित्रपट