काम करूनही कलाकारांना मानधन न मिळण्याचे अनेक प्रसंग मराठी सिनेसृष्टीत घडताना दिसत आहेत. काही महिन्यांपूर्वीच शशांक केतकरने ही बाब समोर आणली होती. सोशल मीडियावरुन शशांकने दिग्दर्शक-निर्मात्याचं थेट नाव घेत अनेक वर्ष लोटूनही मानधन न मिळाल्याचं त्याने व्हिडीओत सांगितलं होतं. त्यानंतर आणखी काही कलाकारांनी त्यांचे प्रसंगही शेअर केले होते. आता अभिनेत्री गार्गी फुले यांनीदेखील यासंदर्भात सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे.
गार्गी फुलेंनी शेअर केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की "जगाला उपदेश देत जे फिकत असतात की धंदा कसा करावा, फिल्ममध्ये कसा पैसा आहे...पैसा नाही आणि काय केलं की फिल्म चालू शकेल विशेषत: मराठी...त्यांनी आधी केलेल्या कामांचे पैसे द्यावेत लोकांना...काम करणारे लोक भिकारी नाहीत. मेहनत करतात आणि त्याचा मोबदला असतो जो आधीच ठरलेला असतो. ही आता नुसती पोस्ट टाकतेय...यापुढे नावासकट लिस्ट टाकेन... ता.क. माझे कुठलेही पैसे बुडले नाहीत. पण माझ्या प्रियजनांचे अजून दिले नाहीत. तेव्हा कृपया मला फोन करून विचारू नये काय झालं म्हणून..". गार्गी फुलेंचं मानधन किंवा कामाचे पैसे बुडालेले नाहीत. मात्र त्यांनी त्यांच्या मित्रपरिवारातील काही व्यक्तींसाठी ही पोस्ट शेअर केली आहे.
गार्गी फुले या दिवंगत अभिनेते निळू फुले यांच्या मुलगी आहेत. गेल्या काही वर्षांपासून त्या मराठी कलाविश्वात कार्यरत आहेत. 'राजा राणीची गं जोडी', 'तुला पाहते रे', 'इंद्रायणी', 'सुंदरा' या मालिकांमध्ये त्या महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसल्या. तर 'मसाला', 'हवाहवाई', 'नवरदेव बीएस्सी अॅग्री', 'कडीपत्ता', 'चिकटगुंडे' या सिनेमांमध्ये त्या झळकल्या आहेत. तर काही नाटकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.
Web Summary : Gargi Phule criticizes the Marathi film industry for not paying artists. She warns she will publicly name those who withhold payments owed to her friends and colleagues. Phule emphasizes artists deserve their due compensation.
Web Summary : गार्गी फुले ने मराठी फिल्म उद्योग की कलाकारों को भुगतान न करने के लिए आलोचना की। उन्होंने चेतावनी दी कि वह उन लोगों का सार्वजनिक रूप से नाम लेंगी जो उनके दोस्तों और सहयोगियों को देय राशि रोकते हैं। फुले ने जोर दिया कि कलाकार अपने उचित मुआवजे के हकदार हैं।