Join us

रात्रीच खेळ चाले रंगमंचावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2016 14:53 IST

             मराठी चित्रपट जसे सातासमुद्रापार जाऊ लागले आहेत. तसेच आता मराठी नाट्यसृष्टीने देखील ...

 
            मराठी चित्रपट जसे सातासमुद्रापार जाऊ लागले आहेत. तसेच आता मराठी नाट्यसृष्टीने देखील परदेशात जाऊन झेंडा फडकविला आहे. अनेक दर्जेदार नाटके सध्या रंगभूमी गाजवित आहेत. कलाकार देखील चित्रपट आणि मालिकांमधून वेळ काढून नाटकांच्या तालमी करीत आहेत. बरेच कलाकार आपल्याला सध्या रंगमंचावर दिसत आहेत. नाट्यसृष्टी गाजविण्यासाठी  आता एक नवीन नाटक सज्ज झाले आहे. रात्रीच खेळ चाले हे एक वेगळ््या विषयावरील नाटक  नाट्यरसिकांसाठी अवतरले आहे. अभिनेता नयन जाधव आणि अभिनेत्री सीमा घोगळे-पारकर यांच्या प्रमुख भूमिका आपल्याला या नाटकात पाहायला मिळणार आहेत. नाटकाच्या नावावरून तरी रहस्यमय गोष्टींवर आधारीत हे नाटक असल्याचे वाटते. नाटकाचे पोस्टर पाहता काळोख्या रात्रीत डोकावणारा चंद्र पाहायला मिळतो. खरंच रहस्यांनी वेढलेले हे नाटक आहे का ते प्रेक्षकांना लवकरच समजेल.