‘गुनेहगार इश्क’चा तरुणाईवर फिव्हर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2016 10:04 IST
गाण्यांमध्ये ‘लव्ह साँग’ला सर्वात जास्त डिमांड आहे. म्हणून तर चित्रपटांत आवर्जून प्रेमगीत असते. असेच एक नवीन लव्ह साँग सध्या ...
‘गुनेहगार इश्क’चा तरुणाईवर फिव्हर
गाण्यांमध्ये ‘लव्ह साँग’ला सर्वात जास्त डिमांड आहे. म्हणून तर चित्रपटांत आवर्जून प्रेमगीत असते. असेच एक नवीन लव्ह साँग सध्या खूप चर्चेत आहे.‘गुनेहगार इश्क’ नावाच्या या सिंगलला सोशल मीडियावर चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. नव्या दमाचा गायक सईद राही उमेरचे हे नवे गाणे असून व्हिडिओमध्ये त्याच्यासह शरमीन काझी आहे.व्हिनस वर्ल्डवाईड एंटरनेटमेंट या म्युझिक लेबलद्वारे हे गाणे रिलिज करण्यात आले आहे. मुळचा काश्मीरचा असलेल्या सईदने ‘एमटीव्ही कलर्स आॅफ यूथ 2013’मध्ये सहभागी झाला होता. पुण्यातून बेस्ट सिंगर म्हणून त्याची शोमध्ये निवड करण्यात आली होती. त्याच्या या नव्या गाण्याबद्दल सईद सांगतो की, प्रेमभावना आणि मेलडीचे परफेक्ट मिश्रण म्हणजे ‘गुनेहगार इश्क’ हे गाणे आहे. हृदयाला भिडणारी चाल आणि शब्दांमुळे रसिकांची त्याला पसंती मिळत आहे. एक चांगले लव्ह साँग तयार केल्याचा मला आनंद तर आहेच आणि लोकांनाही ते आवडते म्हटल्यावर माझा आनंद द्विगुणीत झाला आहे.