अंदाज-ए-तेजस्वीनी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2017 13:25 IST
कलाकार सोशल साईट्सवर नेहमीच अपडेटेड असतात. वेगवेगळे फोटो, चित्रपटांचे स्टेटस सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता हेच पाहा ...
अंदाज-ए-तेजस्वीनी
कलाकार सोशल साईट्सवर नेहमीच अपडेटेड असतात. वेगवेगळे फोटो, चित्रपटांचे स्टेटस सतत सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. आता हेच पाहा ना, अभिनेत्री तेजस्वीनी पंडितने नुकताच एक झक्कास फोटो टविटरवर पोस्ट केला आहे. या फोटो मध्ये तेजस्वीनी अतिशय हटके लुकमध्ये दिसत आहे. शिवाय ती सांगतेय, हा माझा न्यु लुक आणि नवीन प्रोफाईल फोटो आहे. आता तेजस्वीनी कोणत्या चित्रपटामध्ये आपल्याला या लुकमध्ये दिसणार का हे मात्र अजुन तरी गुलदस्त्यातच आहे. परंतू तिचा हा न्यु लुक मात्र तिच्या चाहत्यांना आवडत असल्याचे पाहायला मिळतेय. तेजस्वीनीच्या या फाटोला सोशलसाईट्सवर अनेक लाईक्स मिळत आहेत. नेटीझन्सनी तर या मराठमोळ््या मुलीच्या वेस्टर्न अंदाजाचे फारच कौतुक केले आहे. सध्या तेजस्वीनी देवा या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटामध्ये देखील ती अशाच वेगळ््या लुकमध्ये दिसणार आहे. मग आता तिचा हा लुक देवा चित्रपटामधील तर नाही ना असा प्रश्न देखील पडतोय. पण ते काहीही असले तरी या न्यु लुकमध्ये तेजस्वीनी झक्कास दिसतेय एवढे मात्र खरे.