Join us
Daily Top 2Weekly Top 5

अमर फोटो स्टुडिओच्या ५० व्या प्रयोगानिमित्त फ्लॅश मॉब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2017 11:35 IST

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची चर्चा सुरूवातीपासूनच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकाने विविध ठिकाणी नाटकाचे प्रयोग सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता हे नाटक ५० व्या प्रयोगाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. या नाटकाच्या संपूर्ण टीमने ५० वा प्रयोग अनोख्या पध्दतीने साजरा करत असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे.

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित अमर फोटो स्टुडिओ या नाटकाची चर्चा सुरूवातीपासूनच रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे. या नाटकाने विविध ठिकाणी नाटकाचे प्रयोग सादर करून प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. आता हे नाटक ५० व्या प्रयोगाकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. या नाटकाच्या संपूर्ण टीमने ५० वा प्रयोग अनोख्या पध्दतीने साजरा करत असल्याचे सोशलमीडियावर पाहायला मिळत आहे. कारण आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सुनिल बर्वे याने नुकताच एक व्हिडीओ अपलोड केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये प्रेक्षकांची लाडकी कोरिओग्राफरसहित सुनिल सांगतो, अमर फोटो स्टुडिओच्या ५० व्या प्रयोगानिमित्त फ्लॅश मॉबचे आयोजन केले आहे. तर त्यापाठोपाठ  प्रेक्षकांचा लाडका अभिनेता अमेय वाघनेदेखील नाटकाच्या ५० व्या प्रयोगानिमित्त फ्लॅश मॉब केले असल्याचा एक व्हिडीओ सोशलमीडियावर अपलोड केला आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये अमर फोटो स्टुडिओची संपूर्ण टीमसहित मराठी चित्रपटसृष्टीची कोरिओग्राफर फुलवा खामकर गाण्यावर ठेका पकडताना दिसत आहे. अशा अनोख्य पध्दतीने या सर्व टीमनेच ५० व्या प्रयोगानिमित्त आनंद साजरा केला असल्याचे पाहायला मिळत आहे. कलाकारखाना प्रस्तुती आणि सुबक निर्मित अमर फोटो स्टुडियो हे नाटक आहे. या नाटकमध्ये अमेय वाघ, सखी गोखले, सुव्रत जोशी, पूजा ठोंबरे या कलाकारांचा समावेश आहे. या नाटकाचे लिखान मनस्विनी हिने केले आहे. यापूर्वी या नाटकातील कलाकारांची दिल दोस्ती दुनियादारी ही मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले होते. त्यामुळे या नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांचे लाडके कलाकार आपल्या अभिनयाची चुणूक दाखवित असल्यामुळे यांचे चाहतेदेखील खूश असल्याचे पाहायला मिळत आहे.