Join us

पहिल्यांदाच सुबोध भावेसह झळकणार सोनाली कुलकर्णी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 11:34 IST

पहिल्यांदाच सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी रूपेरी पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या जुनमध्ये हा सिनेमा रसिकाच्या भेटीला ...

पहिल्यांदाच सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी रूपेरी पडद्यावर एकत्र झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या जुनमध्ये हा सिनेमा रसिकाच्या भेटीला येणार असल्याचे कळतंय. सध्या सिनेमाचे नाव ठरलेले नसून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार आहे. आजच्या काळातली रोमँटीक कथेवर सिनेमा आधारित असून डा.स्वप्ना वाघमारे सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत.सुबोध भावेसह काम करण्यात एक वेगळीच मजा येते. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुबोधसह एका सिनेमात काम करतेय त्यामुळे खूप आनंद वाटत असल्याचे सोनाली कुलकुर्णीने सांगितले.तसेच पहिल्यांदाच हंपी येथे जावून तिने एक सिनेमा शूट केला आहे.त्यामुळे हंपीतले नयनरम्य लोकेशन्स सिनेमात पाहायला मिळणार आहेत.लवकरच हंपीत शूट झालेल्या सिनेमाची घोषणा करण्यात येणार आहे.आगामी काळात गंभीर तसेच वेगवेगळ्या विषयांवर सिनेमाचे प्लॅनिंग असल्याचे सोनालीने सांगितले.तसेच छोट्या पडद्यावरील कॉमेडी शोविषयी सांगताना सोनाली सांगते,कॉमेडीची बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मी छोट्या पडद्यावर कॉमेडी शोची जज म्हणून एंट्री मारली आहे. महेश कोठारे यांच्यासोबत स्क्रीन शेअर करायला मिळणं एक खूप मोठा अनुभव आहे. याशिवाय हा शो जज करताना मला माझी प्रतिक्रिया देता येते, मला काय वाटतं ते सांगता येतं. सोनाली कुलकर्णी म्हणून मला जे वाटते ते मी सांगत असते. त्यामुळे कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमध्ये जजिंगचा अनुभव माझ्यासाठी खूप मजेशीर आहे.