Join us

सौरभ पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 17:38 IST

Exculsive - बेनझीर जमादार                        आवाज या मालिकेतून ...

Exculsive - बेनझीर जमादार       
                 
आवाज या मालिकेतून नुकतीच अभिनेता सौरभ गोखले याने ज्ञानेश्वरांची भूमिका यशस्वीरीत्या साकारली होती. पण आता, सौरभ ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतून थेट निगेटिव्ह भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आश्चर्य वाटले ना, पण हो सौरभ पाहिले ना मी तूला या चित्रपटात निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मधुरा देशपांडे झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गणेश कदम यांनी केले आहे. या निगेटिव्ह भूमिकेबद्दल लोकमत सीएनएक्सशी बोलताना सौरभ गोखले म्हणाला, कलाकार हा एकाच स्टाईलच्या इमेजमध्ये अडकून राहिला. तर त्याला त्याच भूमिकांचा  कंटाळा येऊ लागतो. तसेच प्रेक्षक देखील त्याला वेगळया भूमिकेत स्वीकारायला लवकर तयार होत नाही. म्हणून प्रत्येक कलाकारासाठी विविध भूमिका साकारणे ही खूप महत्वाची गोष्ट असते. आणि आशा वेगवेगळया प्रकारच्या भूमिका मला स्वीकारायला मिळतात हे मी माझं भाग्य समजतो. तसेच या चित्रपटातून मी पहिल्यांदा निगेटिव्ह भूमिका साकारणार आहे. अशी वेगळी व हटके भूमिका माझ्या वाटयाला आल्याने मी खूप आनंदी आहे. आता, या चित्रपटाचे शेवटचे काही चित्रीकरण शिल्लक आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.