Join us

लग्नानंतर पहिल्यांदाच सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या प्रोजेक्टसाठी आले एकत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 17:10 IST

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर लग्नानंतर आता पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी एकत्र आले आहेत.

अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर हे दोघे काही महिन्यांपूर्वी लग्नबेडीत अडकले. लग्नानंतर आता पहिल्यांदाच एका प्रोजेक्टसाठी ते एकत्र आले आहेत.  'स्टोरीटेल मराठी' या जगविख्यात ऑडिओबुकने खास नव्याने तयार केलेल्या त्यांच्या ओरिजनल ऑडिओबुक सिरीजमध्ये हे दांपत्य लग्नानंतर प्रथमच एकत्र आले आहेत.

' हौस हजबंड'असं नाव असलेली हि ओरिजनल धम्माल ऑडिओ सिरीज 'स्टोरीटेल मराठी'ने तयार करून नवा पायंडा रचला आहे. रोहित आणि रेवा… आत्ताच लग्न झालेलं, एकमेकांच्या सुपर प्रेमात असलेले एक कपल… एकदम गुटर्रर्रर्रगूं! पण त्यांच्या नवरा बायकोच्या रोलबद्दलच्या कन्सेप्ट जरा उलट्यापालट्या आहेत… पण आजूबाजूची जालिम दुनिया त्यांना पाहिजे तसं जगू देत नाही. घरात येणाऱ्या मदतनीस ताईंपासून ते पार्कातल्या काकांपर्यंत आणि मित्रमैत्रिणींपासून ते दोघांच्या सासवांपर्यंत… सगळे मिळून या दोघा बिचाऱ्यांना सॉलिड सासुरवास उर्फ मेंटल टॉर्चर करतायत… तर अशा वेळी त्यांची दोघांची टीम सॉलिड राहते का? त्यांच्यात जालिम दुनिया फूट पाडते? रेवाचा स्वयंपाक आणि रोहितचा जॉब या किश्श्याचं नेमकं काय होतं? त्याची एक सॉलिड रोमँटिक यूथफुल गोष्ट म्हणजेच हौस हजबंड'.

 चतुरस्र युवा लेखिका गौरी पटवर्धन यांच्याच लेखनीतून 'हाऊस हजबंड' उतरले आहे. आधीच्या दोन्ही सिरीजप्रमाणेच या सीरिजलाही साहित्यप्रेमी प्रचंड प्रतिसाद देतील असा विश्वास 'स्टोरीटेल मराठी'ला आहे. मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे उत्तम अभिनय कौशल्यामुळे सिद्धार्थ मितालीच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेच आता ते आपल्या आवाजाच्या जादूनेही रसिकांना घायाळ करणार आहेत.

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरमिताली मयेकर