स्पृहाची पहिल्यांदाच परदेशवारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 16:49 IST
कलाकारांना शुटिंगसाठी म्हणा कि कोणत्या कामासाठी असो परदेशात जाण्याचा योग हा येतोच. मराठी सिनेमा ...
स्पृहाची पहिल्यांदाच परदेशवारी
कलाकारांना शुटिंगसाठी म्हणा कि कोणत्या कामासाठी असो परदेशात जाण्याचा योग हा येतोच. मराठी सिनेमा जसा ग्लोबल होत आहे, तसे मराठी चित्रपटांचे चित्रीकरण देखील परदेशांमध्ये होण्याचे प्रमाण वाढले आहे. मग अ्से असताना आपले कलाकार जर परदेशात कधी गेलेच नाहीत असे जर ऐकले तर नवलच वाटेल ना. अन तेही जर आघाडीची अभिनेत्री स्पहा जोशी म्हणत असेल की मी पहिल्यांदाच परदेशात जात आहे मग तर तिच्या चाहत्यांचा यावर विश्वास बसणे थोडे अवघडच आहे. स्पृहा जोशीने म्हटले तर आहे की मी पहिल्यांदाच परदेशात जातेय, पण ती पहिल्यांदा जातेय ती नाटकाच्या शो साठी. स्पृहा पहिल्यांदाच डोन्ट वरी बी हॅपी या नाटकाचा प्रयोग प्ररदेशात करण्यासाठी सज्ज झाली आहे. मराठी सिनेमा जसा सातासमुद्रापार पोहचला आहे तसेच आता आपल्या नाटकांचे प्रयोग देखील परदेशात होत असुन मराठी नाटक ग्लोबल होत आहे. स्पृहा जोशी अन उमेश कामत यांच्या भुमिका असलेल्या या नाटकाचा परदेशातील पहिला प्रयोग सिंगापुर येथे होत असुन त्यासाठी संपुर्ण टिमच एक्सायटेड आहे स्पृहाच्या या परदेशवारीसाठी तिचे चाहते तर नक्कीच आॅल द बेस्ट म्हणतील यात शंका नाही.