व्हेंटिलेटरचे पहिले गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2016 16:15 IST
राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्यानंतर मी या चित्रपटासाठी फार उत्साही असल्याचे प्रियांका चोप्राने तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ...
व्हेंटिलेटरचे पहिले गाणे
राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्यानंतर मी या चित्रपटासाठी फार उत्साही असल्याचे प्रियांका चोप्राने तिच्या ट्विटर अकाऊंटद्वारे सांगितले होते. आता याच ट्विटरच्या माध्यमातून तिने या चित्रपटाचे पहिले गाणे लाँच केले आहे. या रे या, सा रे या हे गाणेचे बोल आहेत. या गाण्याचा मुखडा शांताराम मापुसकर यांनी लिहिला असून मनोज यादव याने गाण्याचा अंतरा लिहिला आहे. रोहन रोहन या जोडीने दिलेल्या संगीतामुळे या गाण्याची शोभा अधिक वाढली आहे. }}}}