भारताने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकिस्तानी सैन्याने बुधवारी जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील गावांना लक्ष्य करून जोरदार गोळीबार केला. यात सीमेवरील गावांतील चार मुलांसह १६ जण ठार आणि १५० जण जखमी झाले. पाकिस्तानी गोळीबारात सर्वाधिक नुकसान पूंछ जिल्ह्यात झाले आहे. भारतीय सैन्य गोळीबाराला योग्य प्रत्युत्तर देत आहे. यामध्ये अनेक निरपराध सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. याविषयी तेजस्विनी पंडितने पोस्ट लिहिली आहे.
तेजस्विनी पंडितची पोस्ट चर्चेत
पूंछमध्ये दहशतवादी हल्ला केल्यानंतर यामध्ये स्थानिक नागरीक या हल्ल्यात मृत्यूमुखी पडले. पाकिस्तानने केलेल्या या भ्याड हल्ल्यात किमान १२ नागरीक ठार झाले असून ४२ जण जखमी झाले. याविषयी तेजस्विनी पंडितने पोस्ट शेअर करुन लिहिलंय की, "हे काय चाललंय ?? पूंछ…. निरपराध लोकांचे जीव जात आहेत. हे सगळं थांबायला हवं, निशब्द !" अशा शब्दात तेजस्विनीने पोस्ट करुन या हल्ल्याविषयी दुःख व्यक्त केलंय.
पूंछमध्ये हल्ला
पूंछच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने या हल्ल्याबद्दल माहिती दिली. याशिवाय मृतांची संख्या दुजोरा देत सांगितले की, मृतांमध्ये सात ते १४ वर्षे वयोगटातील चार मुले आहेत. चार अल्पवयीन मुलांमध्ये दोन भावंडे होती. मृतांमध्ये एका महिलेसह शीख समुदायाचे चार सदस्यही होते. पाकिस्तानी गोळीबारात दारुल उलूम मदरसा क्वारीचे मुस्लिम धर्मगुरू मोहम्मद इक्बाल यांचाही मृत्यू झाला. सध्या जम्मूमधील सर्व सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर असून काही ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद ठेवायला सांगितल्या आहेत.