Finaly Secrets Revealed'सैराट' फेम या आकाश ठोसर पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2017 18:53 IST
आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं, ते काय करतात, त्यांना काय काय आवडते याविषयी जाणून घेण्याची फॅन्समध्ये उत्सुकता असते. ...
Finaly Secrets Revealed'सैराट' फेम या आकाश ठोसर पडला या अभिनेत्रीच्या प्रेमात?
आपल्या लाडक्या कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावणं, ते काय करतात, त्यांना काय काय आवडते याविषयी जाणून घेण्याची फॅन्समध्ये उत्सुकता असते. विशेष म्हणजे त्यांची लव लाईफ, कोणत्या व्यक्तिशी त्यांचे अफेअर आहे या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यात चाहत्यांनाही रस असतो.फक्त मीडियामुळेच या बातम्या समोर येतात. मात्र यावेळी थोडे वेगळे घडले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सैराट फेम परशा अर्थात आकाश ठोसर याच्याविषयी एक गुपित उघड केले आहे. आकाश एका मुलीच्या प्रेमात पडल्याचे आम्ही नाहीतर खुद्द महेश मांजरेकर यांनीच एका कार्यक्रमात हे सांगितले आहे.मात्र आकाश ज्या मुलीच्या प्रेमात पडला आहे ती मुलगी कोण? हे गुलदस्त्याच ठेवले आहे.मात्र आकाश म्हणजेच आपला परशा ठोसर जिच्या प्रेमात पडला आहे, सैराट' सिनेमानंतर आकाश ठोसर महेश मांजरेकर यांचा 'एफयु' या आगामी सिनेमात झळकणार आहे.या सिनेमात आकाशसह वैदेही परशुरामी,मधुरा देसाई,रिया बर्मन यांच्या भूमिका आहेत.शिवाय ईशा कोपीकरसुद्धा या सिनेमात पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे.'एफयू' हा ब्लॉकबस्टर सिनेमा असणार यांत काहीच दुमत नसून सगळेच रसिक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहेत.कॉलेज जीवनावर आधारित सिनेमा असल्याने तरूणांमध्ये अधिक उत्सुकता पाहायला मिळतेय. आकाश ठोसर याच सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा रसिकांच्या भेटीला येणार असल्यामुळे सोशल मीडियावर आकाशचे चाहते त्याला अनेक प्रश्न विचारताना दिसतात. सिनेमाची रिलीज डेट निश्चीत नाही.मात्र जेव्हा हा सिनेमा रूपेरी पडद्यावर झळकेल त्यावेळी नक्कीच रसिकांच्या पसंतीस उतरेल अशी आशाही सिनेमाच्या टीमकडून व्यक्त केल्या जात आहेत. मात्र सध्या तरी रुपेरी पडद्यावरील 'परशा'च्या रियल लाइफ आर्चीच्या म्हणजेच आकाश कोणाच्या प्रेमात पडला आहे असा प्रश्न आकाशच्या चाहत्यांना सतावत असल्यामुळे या परशाच्या प्रेमात बुडालेल्या तरुणींचं हार्टब्रेक झालं असणार हे मात्र नक्की !