Join us

गणवेशची कथा लिहितानाच रोल झाला फायनल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:47 IST

          चित्रपटाची कथा लिहिताना लेखकाला अनेकदा त्या कथेच्या पात्रांमध्ये एकदम परफेक्ट बसणारे कलाकार दिसु लागतात. ...

          चित्रपटाची कथा लिहिताना लेखकाला अनेकदा त्या कथेच्या पात्रांमध्ये एकदम परफेक्ट बसणारे कलाकार दिसु लागतात. जसजशी ती कथा पुढे जाते तसतसे त्या पात्रांचे त्या कथेशी असलेले नाते अधिकच दृढ होत जाते अन त्यांची नाळ घट्ट होऊन ते कलाकार लेखकाला अगदी हुबेहूब त्या रोलमध्ये दिसु लागतात. आता असेच काही झाले आहे गणवेश या सिनेमा विषयी. या चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल जगदाळे यांना गणवेशच्या एका भुमिकेसाठी अभिनेते किशोर कदम डोक्यात होते. अन त्यांनी मग या रोलसाठी किशोर कदम यांची निवड केली. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या गोष्टीचे गुपित दिग्दर्शकांनी उलगडले अन सांगितले की ही कथा लिहीतानाच यामध्ये मला किशोर कदम दिसत होते. अन तेव्हाच त्यांचा रोल फायनल झाला होता. आपल्यालाही माहितच आहे की किशोर कदम यांचा रांगडा अभिनय प्रेक्षकांना भावतो. त्यांच्या आवाजातील लकब अन संवादकौशल्य यावर अनेक जण फिदा आहेतच. नटरंग, फॅन्ड्री, परतू या चित्रपटांतील त्यांच्या भुमिका कायमच लक्षात राहिल्या आहेत. आता किशोर कदम आपल्याला पुन्हा एकदा गणवेश मध्ये एका वडिलांची भुमिका करताना दिसणार आहेत.  अन म्हणुनच हा रोल त्यांनी कशाप्रकारे साकारला आहे यासाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये नक्कीच हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली असेल यात काही शंका नाही.