बाबांच्या आग्रहामुळे संस्कृतीने केला चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 13:53 IST
आपल्याला चांगल्या प्रकारचे, वेगळ््या विषयाचे रोल करायला मिळावेत अशी इच्छा तर प्रत्येक ...
बाबांच्या आग्रहामुळे संस्कृतीने केला चित्रपट
आपल्याला चांगल्या प्रकारचे, वेगळ््या विषयाचे रोल करायला मिळावेत अशी इच्छा तर प्रत्येक कलाकाराचीच असते. अभिनेत्यांना त्यांचा प्रत्येक चित्रपट हा जवळचा असतो. अन म्हणुनच कलाकार मंडळी त्यांच्या चित्रपटांचे सिलेक्शन करताना चोखंदळ असतात. एकवेळ कमी चित्रपट केले तरी चालतील पण चांगल्या भुमिका करायच्या अशी सुत्रे अनेक कलाकारांची असतात. आता पहा ना मालिकां मध्ये काम केल्यानंतर संस्कृती बालगुडे चित्रपटांकडे वळली. सोज्वळ अशी इमेज तिने शा्रर्टकट या सिनेमामध्ये ब्रेक केली अन ग्लॅमरस लुकमध्ये प्रेक्षकांसमोर ती आली. संस्कृती ही उत्तम डान्सर असुन तीने आजपर्यंत चित्रपटांमध्ये दर्जेदार भुमिका करुन प्रेक्षकांची वाहवा मिळवली आहे. आता ती दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहे. या सिनेमाच्या नावातच हळवेपण असल्याने मुली अन वडिलांचे भावनिक नाते यामध्ये दाखविण्यात आले आहे. सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये संस्कृतीने हा चित्रपट तिला कसा मिळाला याबद्दल सांगितले. ती म्हणाली, या सिनेमाचे निर्माते माझ्या वडिलांचे चांगले मित्र आहेत. अन त्यांना या चित्रपटाचा विषय आवडल्याने माझ्या पप्पांनी मला हा सिनेमा करण्यास सांगितले. माझे अन माझ्या वडिलांचे नाते देखील खुपच जवळचे आहे, मी त्यांनी इमोशनली अॅटॅच आहे. अन सिनेमाची कथा सुद्धा मला आवडल्याने मी हा चित्रपट स्वीकारला. वडिलांच्या आग्रहाखातर केलेल्या या सिनेमात संस्कृती कसा अभिनय करतीये हे पाहणे इंटरेस्टींग असणार आहे.