Join us

‘कोडमंत्र’ नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १८ जून रोजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2016 17:35 IST

गुजराती रंगभूमीवर प्रचंड गाजलेले   ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठीत पाहायला मिळणार असून हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १८ ...

गुजराती रंगभूमीवर प्रचंड गाजलेले   ‘कोडमंत्र’ हे नाटक आता मराठीत पाहायला मिळणार असून हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवार दि. १८ जून रोजी सायंकाळी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे होत आहे. अनामिका व रसिका निर्मित आणि अमरदीप व साईसाक्षी प्रकाशित  ‘कोडमंत्र’ या नाटकाची निर्मिती भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर,व मुक्ता बर्वे करीत आहेत. या नाटकाच्या मूळ लेखिका स्नेहा देसाई हया असून मराठीत रूपांतर विजय निकम यांनी केले आहे तर दिग्दर्शन राजेश जोशी करीत आहेत. या नाटकात स्वत: मुक्ता बर्वे यांची मजेशीर व लक्षवेधी भूमिका असून सोबत अजय पुरकर, उमेश जगताप, विक्रम गायकवाड, स्वाति बोवलेकर, अतुल महाजन, मिलिंद अधिकारी, कौस्तुभ दिवाण, अमित जांभेकर, संजय महाडीक, फैज खान, अजय कासुर्डे, संजय खापरे आणि कॅडेट्स सह अन्य २७ कलाकारांचा सहभाग आहे.    ‘कोडमंत्र’ हे नाटक लष्कराच्या पार्श्वभूमीवर आधारित असून सीमेवर घडणार्‍या घटना व त्या संदर्भात घडणार्‍या गोष्टी हया नाटकात आहेत. हे राष्ट्रीय एकात्मतेवरील नाटक असल्यामुळे मराठी भाषेतही तितकेच प्रभावशाली ठरेल हया उद्देश्याने निमार्ते भरत नारायणदास ठक्कर, दिनेश पेडणेकर व मुक्ता बर्वे यांनी हे नाटक मराठीत आणले आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रसाद वालावलकर, पार्श्वसंगीत सचिन जिगर, प्रकाशयोजना भौतेश व्यास, दिग्दर्शन सहाय्य सूरज व्यास, वेशभूषा अजय अरविंदभाई खत्री, सहनिमार्ता अजय कासुर्डे तर प्रसिद्धी दिपक जाधव यांची आहे. कॅडेट्स प्रशिक्षण वॅलेटाईन फर्नांडिस व संदीप शर्मा यांनी दिले आहे.