Join us

फैय्याज शेख यांनी उलगडला यशस्वी वाटचालीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2016 11:33 IST

मराठी चित्रपटसृष्ट्रीची जेष्ठ अभिनेत्री आणि गायिका फैय्याज शेख यांनी पुर्नभेटच्या निमित्ताने आपल्या यशस्वी वाटचालीचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, पु.ल. व ...

मराठी चित्रपटसृष्ट्रीची जेष्ठ अभिनेत्री आणि गायिका फैय्याज शेख यांनी पुर्नभेटच्या निमित्ताने आपल्या यशस्वी वाटचालीचा प्रवास उलगडला. त्या म्हणाल्या, पु.ल. व सुनीताबाई यांच्याबरोबर त्या वटवट वटवट नाटकात काम करत होते. पुलंच्या एका नवीन नाटकाच्या वाचनासाठी पुल व सुनीताबाईंनी त्यांना बोलाविले. पण बाहेरगावी असलेला नाटयप्रयोग व अन्य काही कारणाने उपस्थित राहू शकले नाही. ही एक संधी माझ्या हातातून निसटली.  ते नाटक होते ती फुलराणी. मात्र प्रख्यात गायिका बेगम अख्तर यांच्याकडे गाणे शिकण्याची संधीही  चालून आली. त्यासाठी त्यांचा गंडाबांधून लखनौला जावे लागले असते. घरची सगळी जबाबदारी असल्याने मुंबई आणि नाटक सोडून लखनौला जाणे शक्य झाले नाही. फुलराणीच्या वाचनाला जाऊ शकले नसले तरी पुढे काय झाले ते मलाही कळले नाही. पण त्या नाटकात काम करण्याची संधी मला मिळाली नाही. बेगम अख्तर आणि पं. वसंतराव देशपांडे यांची ओळख व मैत्री होती. त्या मुंबईला आल्या होत्या तेव्हा वसंतराव देशपांडे मला त्यांना भेटायला घेऊन गेले. या माज्या बेटीला तू गाणे शिकव असे त्यांनी बेगमना सांगितल्यावर, माझा गंडा बांधून लखनौला माज्या घरी येऊन राहावे लागेल,असे त्या म्हणाल्या. घरची आर्थिक जबाबदारी माज्यावर असल्याने मुंबई व नाटक सोडून लखनौला गेले तर घरी पैसे कसे पाठवता येणार, त्यापेक्षा नकोच ते असा विचार मी केला. त्यावेळी काशिनाथ घाणेकर यांनी तू लखनौला जा, घरखचार्साठी जे काही पैसे लागतील ते मी तुज्या घरच्यांना देईन, असे सांगून मनाचा मोठेपणा दाखवला होता. पण ते पटले नाही. बेगम अख्तर यांच्याकडे शिकण्याची संधीही गेली. घरकुल चित्रपटासाठी मला पाश्र्वगायनासाठी राष्ट्रीय पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. मात्र तीही संधी हुकली. माज्या आयुष्यात अशा काही संधी आल्या, पण काही ना काही कारणाने त्या हुकल्या. त्यामुळे प्रत्येक वेळी हातातून गोष्टी निसटत गेल्याची ते दु:ख मनात आजही कुठेतरी आहे. मात्र असे असले तरी जे मिळाले त्यात समाधानी, आनंदी आहे. रसिकांचे अलोट प्रेम मला मिळाले. आजही त्याचा अनुभव येतो. त्यांची सदैव ऋणी आहे, असे त्या यावेळी म्हणाल्या. अशा प्रकारे त्यांनी आयुष्यातील अनेक गोष्टींच्या आठवणी जाग्या केल्या.