Join us

फराह खान करणार पुन्हा मराठीत नृत्यदिग्दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2017 12:25 IST

मराठी चित्रपटसृष्टीचे यश पाहता, सलमान खान, विदया बालन, प्रियांका चोप्रा यांसारखे अनेक बॉलिवुडचे तगडे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत येत असल्याचे ...

मराठी चित्रपटसृष्टीचे यश पाहता, सलमान खान, विदया बालन, प्रियांका चोप्रा यांसारखे अनेक बॉलिवुडचे तगडे कलाकार मराठी चित्रपटसृष्टीत येत असल्याचे पाहायला मिळत आहे. आता हेच पाहा ना, बॉलिवुडची तगडी नृत्यदिग्दर्शिका फराह खान हीदेखील पुन्हा मराठी इंडस्ट्रीच्या प्रेमात पडलेली दिसत आहे. कारण ती लवकरच एका मराठी चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणार आहे. ह्रदयांतर असे या चित्रपटाचे नाव आहे. विक्रम फडणीस दिग्दर्शित हा चित्रपट आहे. या चित्रपटात अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे झळकणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाची चर्चा फारच रंगत असल्याची दिसत आहे. या चित्रपटाविषयी नृत्यदिग्दर्शिका फराह खान सांगतात, मी अनेक भाषांमध्ये काम केल्यामुळे मराठी गाण्यावर नृत्य बसवणं माज्यासाठी तितकंसं कठीण नव्हतं. याआधी मी अगं बाई अरेच्चा या चित्रपटासाठी छम छम करता हे गाणं केलं होतं. गेली काही वर्षे मराठी चित्रपटसृष्टी मोठया प्रमाणावर प्रगती करते आहे. त्यामुळे मला इथे काम करून अतिशय आनंद झाला आहे.         गेली २५ वर्षे मी फॅशन डिझाईन करतोय आणि गेल्या सात वर्षांपासून माझं चित्रपट बनवायचं स्वप्न आता प्रत्यक्ष रूपात येतंय. त्यामुळे मी चांगल्याप्रकारे अनुभवतोय या सर्व गोष्टी. शिवाय मला अनेक लोकांची मदत या निमित्ताने होत आहे. मुक्ता आणि सुबोधने या चित्रपटासाठी अप्रतिम कामगिरी केली आहे. या चित्रपटाचं श्रेय हे माज्या एकटयाचे नसून यामध्ये समावेश असलेल्या प्रत्येक व्यक्तीचं आहे आणि यापुढेही दिग्दर्शक म्हणून काम करायला मला आवडेल. असे मत दिग्दर्शक विक्रम फडणीस यांनी व्यक्त केले.