Join us
Daily Top 2Weekly Top 5

'गेंडास्वामी'म्हणून प्रसिद्ध झालेले दीपक शिर्के अभिनयापासून दूरच,दीर्घ काळापासून आहेत गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 09:00 IST

‘एक शून्य शून्य’ या मालिकेतील हवालदार एक शून्य शून्य ही त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती.

स्वप्नांची दुनिया, मायानगरी, चंदेरी दुनिया अशा किती तरी नावाने चित्रपटसृष्टीला ओळखलं जातं. या झगमगत्या दुनियेत करियर करण्याचं स्वप्न घेऊन अनेकजण येतात. त्यापैकी सगळ्यांनाच इथं झटपट यश मिळतं असंही नाही.कारण कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. 

करिअरच्या ऐन भरात असताना कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या उतारवयात किंवा पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत जे आज दुर्लक्षित झाले आहेत. यांत आणखी एका नावाची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता दीपक शिर्के यांची.लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत अनेक सिनेमात ते झळकले आहेत.

‘एक शून्य शून्य’ या मालिकेतील हवालदार एक शून्य शून्य ही त्यांनी साकारलेली भूमिका प्रचंड गाजली होती. मराठी मालिकांसोबतच 100हून अधिक मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये दीपक शिर्के यांनी काम केले आहे. पण आज दीपक शिर्के हे अनेकांच्या विस्मृतीत गेलेले नाव आहे. सिनेमात ते झळकत नसले तरी ते सध्या कुठे आहेत ? काय करत आहेत ? याविषयीची माहितीसु्द्धा कोणाकडे नाही. सिनेमात तर सोडाच कोणते पुरस्कार सोहळे किंवा इव्हेंट्समध्येसुद्धा ते कधीच दिसत नाहीत.इंडस्ट्रीमध्ये राहण्यासाठी स्वतःचं मार्केटिंग करणं जमायला हवं आणि मला स्वतःचं मार्केटिंग करता येत नाही. कुणाकडे काम मागणं मला कधीच जमलं नाही. पण कोणी निर्मात्या-दिग्दर्शकांनीही मला त्यांच्या सिनेमासाठी विचारलं केलं नाही. 

काही वर्षापूर्वी दीपक शिर्के चर्चेत आले होते. त्यांना काम मिळत नसल्याच्या चर्चा होत्या. कामाच्या शोधात असणारे दीपक शिर्के चांगल्या संधीच्या शोधात होते. अनेकदा शक्ती कपूर यांचे नातेवाईक असल्याचेही बोलले गेले. पण दीपक शिर्के शक्ती कपूर यांचे नातेवाईक असल्याची माहिती चुकीची असल्याचे समोर आले होते. दोघेही नातेवाईक नाहीत.