Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 19:48 IST

Uttara Baokar Passed Away : मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांतील प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले.

मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांतील प्रसिद्ध अभिनेत्री उत्तरा बावकर यांचे दीर्घ आजाराने आज पुण्यात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक भाऊ, एक बहीण, वहिनी आणि भाचा आहे.

ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून उत्तरा या काही आजारांशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

उत्तरा बावकर या 'तमस' या मालिकेमुळे प्रकाशझोतात आल्या. सुमित्रा भावे यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी काम केले होते. अभिनय व आवाजी अभिनय यावर त्यांची हुकूमत होती. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा त त्यांनी अनेक वर्षे अध्यापनाचे काम केले.