Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2025 14:40 IST

सिनेसृष्टीत काम करत असताना प्रदीप पवार यांना एका अभिनेत्रीने लग्न करण्याची ऑफर दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. 

कुलदीप पवार हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज नट. आपल्या अभिनयाने त्यांनी ८०चं दशक गाजवलं. त्यांचे सिनेमे आजही पाहिले जातात. कुलदीप पवार यांच्याप्रमाणेच त्यांचे भाऊ प्रदीप पवारही सिनेसृष्टीत अभिनेता म्हणून काम करत होते. अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये काम करूनही त्यांना हवी तशी प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. सिनेसृष्टीत काम करत असताना प्रदीप पवार यांना एका अभिनेत्रीने लग्न करण्याची ऑफर दिली होती. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केलं. 

प्रदीप पवार यांनी मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीत काम करताना आलेल्या अनुभवाचा एक प्रसंग सांगितला. ते म्हणाले, "एका हिरोईनने जी त्या काळातील टॉप मोस्ट हिरोईन होती. तिने मला ऑफर दिली माझ्या इथून पुढच्या प्रत्येक पिक्चरमध्ये तू असणार ही माझी गॅरंटी....ती टॉपला होती. पण माझ्याशी लग्न करायचं आणि कोणाला सांगायचं नाही. हे माझ्यासाठी क्रिटिकल होतं. हे म्हणजे एकतर माझ्या डोक्याच्या बाहेरची होती ही संकल्पना सगळी....की लग्न करायचं ह्या बाईबरोबर कोणाला सांगायचं नाही आणि ही सांगेल ते सगळं करायचं". 

"आताच्या काळात ही फॅन्टसी वाटेल पण मला मिळाली...मी मूर्ख होतो म्हणा मी नाही ती अॅक्स्पेट केली. मग नाही म्हटल्यानंतर समोरच्या माणसाचा इगो इतका दुखावला की मग मी कुठल्याही सिनेमात असणार नाही याची दक्षता घेतली गेली. त्यामुळे माझ्यासमोर काहीच पर्याय नव्हता. संघर्षही किती करणार. आणि मोठ्या माशाशी लढता येत नाही. त्यांच्याशी पंगा घेऊन चालत नाही. ती व्यक्ती म्हणजे वन मॅन इंडस्ट्री होती. ती फार मोठ्या निर्मात्या, दिग्दर्शकाची पाहुणी होती", असंही त्यांनी पुढे सांगितलं. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी