Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ तुटवडा नोटांचा, रसिकांचा नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 18:40 IST

सध्या सगळीकडेच हजार-पाचशेच्या नोटाबंदिमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनासाठी पैसे खर्च करताना आता ...

सध्या सगळीकडेच हजार-पाचशेच्या नोटाबंदिमुळे नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य लोकांना रोजच्या दैनंदिन जीवनासाठी पैसे खर्च करताना आता बराच विचार करावा लागतो. त्यामुळे नाटक आणि सिनेमाला जाणे तर लांबचीच गोष्ट झाली आहे. नोटा बंदिचा चांगलाच परिणाम नाट्य आणि सिनेसृष्टीवर झाल्याचे दिसून येत आहे. पैसे नसल्याने नागरिकांनी नाटक सिनेमांकडे पाठ फिरवली आहे. काही चित्रपटांचे तर प्रदर्शन देखील यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे. तर बºयाच नाटकांचे प्रयोग अक्षरश: रद्द करण्यात आले आहेत. परंतू अशी परिस्थिती असतानाही जर प्रेक्षकांनी एखादया नाटकाला उदंड प्रतिसाद दिला तर नक्कीच तुम्हाला आश्चर्य वाटेल ना? अहो एवढेच काय तर हजार-पाचशेच्या नोटांचा तुटवडा असताना देखील जर नाटक हाऊसफुल्ल झाले तर नक्कीच त्या नाटकातील कलाकारांना आनंदच होणार. सध्या दोन स्पेशल या मराठी नाटकाची संपूर्ण टिम असाच काही आनंद साजरा करीत आहेत. या नाटकाच्या एका प्रयोगाला नुकताच प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याचे समजतेय. जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक यांच्या भूमिका असलेले दोन स्पेशल हे नाटक सध्या रंगभूमी गाजवत आहे. अनेक कलाकारांनी देखील या नाटकाला पसंती दशर्विली आहे. तर आता प्रेक्षकांनी देखील पैशांची पर्वा न करता या नाटकाच्या प्रयोगाला उपस्थित राहून कलाकारांचे मनोधैर्य वाढवल्याचेच दिसून येत आहे. बरं हा प्रयोग काही महाराष्ट्रात झाला नाही. तर चक्क जबलपूर आणि भोपाल येथील प्रेक्षकांनी नाटकला तुफान गर्दी केली होती. मध्य प्रदेशात या नाटकाचे नुकतेच प्रयोग  झाले. तिथल्या हौशी नाट्यरसिकांनी नाटकाला जाऊन तुडवडा नोटांचा आहे, रसिकांचा नाही हेच दाखवून दिले आहे.  }}}}