Exclusive : मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस यांची जोडी पुन्हा जमणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 16:30 IST
मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस हृद्यांतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटात मुक्ता प्रमुख भूमिका साकारत आहे ...
Exclusive : मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस यांची जोडी पुन्हा जमणार
मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस हृद्यांतर या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. या चित्रपटात मुक्ता प्रमुख भूमिका साकारत आहे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रम फडणवीस करत आहेत. विक्रम हे प्रसिद्ध डिझायनर असून त्यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांसाठी वेशभूषा केली आहे. बॉलिवूडमधील अनेक नायक-नायिकांचे ते आवडते वेशभूषाकार आहेत. अनेक वर्षं डिझायनर म्हणून काम केल्यानंतर आता ते दिग्दर्शनाकडे वळले आहेत. त्यांच्या हृद्यांतर या पहिल्या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटात मुक्ता बर्वेसोबतच सुबोध भावे, सोनाली खरे, अमीत खेडेकर प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची कथा खूप चांगली आणि कलाकारांची फौज तगडी असल्याने या चित्रपटाविषयी प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.हृद्यांतरचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध चेहरेदेखील प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटात शामक दावर, मनिष पॉल यांसारखे बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रेटी आहेत. तसेच बॉलिवूडचा सुपरस्टार हृतिक रोशन या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे. हृद्यांतर या चित्रपटाच्या दरम्यान या चित्रपटातील सगळे कलाकार आणि तंत्रज्ञ यांची खूपच छान गट्टी जमली होती. या चित्रपटाची टीम ही आता एखाद्या कुटुंबाप्रमाणे झाली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मुक्ता बर्वे आणि विक्रम फडणवीस यांची तर खूपच चांगली गट्टी जमली आहे. मुक्तासोबत भविष्यात आणखी तीन चित्रपट करण्याचा विचार विक्रम फडणवीस यांचा आहे. मुक्ता ही खूप चांगली अभिनेत्री असल्याने मला तिच्यासोबत पुन्हा काम करायला आवडेल असे ते सांगतात. Also Read : मुक्ता बर्वे लवकरच दिसणार छोट्या पडद्यावर