Join us

एव्हरग्रीन वर्षा उसगांवकर बर्थ डे स्पेशल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2017 17:21 IST

मराठी इंटस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांना बघितले जाते. वर्षा उसागांवकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अष्टपैलू अभिनेत्री ...

मराठी इंटस्ट्रीतील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षा उसगांवकर यांना बघितले जाते. वर्षा उसागांवकर यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. अष्टपैलू अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कारर्किदीबाबत घेतलेला हा आढावा.  वर्षा उसगांवकर या मूळच्या गोवाच्या असलेले वर्षा उसगांवकर अभिनयाच्या वेडेपायी गोवा सोडून मुंबईत आल्या.  यानंतर त्या कायमच्या मुंबईच्या झाल्या. आली आणि तिनं पाहिलं आणि तिनं जिंकलं अशी उक्ती तिच्याबाबतीत तरी खरी ठरली. सचिन पिळगावंकर दिग्दर्शित 'गंमत जंमत' या चित्रपटातील ‘मी आले, निघाले, सजले, फुलले, फुलपाखरू झाले..’ या गाण्याच्या फसफसणाऱ्या उत्साहात वर्षां उसगांवकरने मराठीत पदार्पण केलं होतं. निखळ विनोदी चित्रपटाचा ट्रेंड मराठी अभिनेत्री म्हणून त्यांनी सेट केला. 'गंमत जंमत' नंतर त्यांनी 'खट्याळ सून नाठाऴ सासू', 'तुझ्याविना करमेना', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी केले. 90च्या दशकातले दूरदर्शन हे सगळ्यात प्रभावी माध्यम होते. यावर येणाऱ्या 'महाभारत' या लोकप्रिय मालिकेतील उत्तराच्या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली. हि मालिका त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पाईंट ठरली. यानंतर त्यांचा कल हिंदी चित्रपटांकडे वाढला. त्यांचा 'यज्ञ' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्ल़ॉप ठरला मात्र जाणकरांना त्यांच्यातील अभिनयक्षमतेची जाणीव करुन गेला. मराठीत तिचे वेगवेगळे प्रयोग सुरू होते. जब्बार पटेल दिग्दर्शित 'एक होता विदूषक'सारख्या आशयघन चित्रपटातून, तसेच सचिन दिग्दर्शित "आत्मविश्‍वास' चित्रपटातील महत्त्वाच्या भूमिकेत तिचे अस्तित्व ठळकपणे जाणवत होते. याच दरम्यान त्यांनी रंगमंचावर देखील प्रवेश केला. ब्रह्मचारी या नाटकाव्दारे त्यांनी रंगमंचावर प्रशांत दामले यांच्यासोबत पदार्पण केले. वर्षा उसगांवकर ही केवळ अभिनेत्री नाही तर एक उत्तम गायिका, नृत्यांगना तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालिका अशी तिची विविध रूपे आहेत. सवत माझी लाडकी या चित्रपटात केलेली त्यांची भूमिका खूपच गाजली.  लग्नानंतर अभिनेत्रीचे करिअर संपते हा समज त्यांनी चुकीचा ठरवला. मोठ्या पडदा असो छोट्या पडदा  किंवा रंगमंच हि तिन्ही माध्यम त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या ताकदीवर जोरदार गाजवली.