Join us
Daily Top 2Weekly Top 5

१०४ डिग्री तापात देखील तेजस्विनीने केले ये रे ये रे पैसाचे शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 11:24 IST

तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम वर नवरात्री स्पेशल जे फोटोशूट पोस्ट केलं आहे त्यातला एक फोटो नक्कीच लक्ष वेधून घेतोय. या ...

तेजस्विनी पंडितने इन्स्टाग्राम वर नवरात्री स्पेशल जे फोटोशूट पोस्ट केलं आहे त्यातला एक फोटो नक्कीच लक्ष वेधून घेतोय. या फोटोत तिच्या हाताला सलाईनची सुई लावलेली दिसतेय. अनेकांना हि सुई कदाचित कॉस्ट्यूम्स आणि मेकअप चा एक भाग वाटेल, परंतु असं अजिबात नाहीये. तेजस्विनी पंडीतची तब्येत सध्या खालावली आहे. आणि हे पाहायला मिळाले ये रे ये रे पैसाच्या सेट वर! सेटवरचा हा फोटो सध्या सर्वत्र पाहायला मिळतोय ज्यात तेजस्विनी अगदी चादर लपेटून बसलीये.तेजस्विनी सध्या संजय जाधव दिग्दर्शित 'ये रे ये रे पैसा'च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. चित्रपटाचं शूटिंग बऱ्यापैकी पार पडलंय, त्यातलं तेजस्विनीचं चित्रीकरण सध्या सुरु आहे. परंतु त्याच दरम्यान तेजस्विनी खूप आजारी पडली, तिला १०४ डिग्री ताप होता आणि त्यामुळे तिला तात्काळ दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं होतं. परंतु केवळ दोन दिवस आराम करून तेजस्विनी पुन्हा एकदा ये रे ये रे पैसाच्या शूटिंगवर रुजू झाली. शूटिंगच्या दरम्यान तेजस्विनीची तब्येत तशी फारशी ठीक नाहीये. तरीदेखील तेजस्विनीने शूटिंग सुरु ठेवलंय. शूटिंगच्या ठिकाणी मध्ये मध्ये ब्रेक घेऊन, औषधे घेणे, सलाइन लावणे असे उपचार करून ती तब्येत जपायचा प्रयत्न करतेय.ये रे ये रे पैसाच्या सेटवर तेजस्विनीची खास काळजी घेतली जातेय. तरीदेखील १०४ डिग्री ताप असताना तेजस्विनी ये रे ये रे पैसाच्या सेटवर तेवढ्याच उत्साहाने काम करत असल्याचे पहायला मिळतंय.आजवर तेजस्विनी पंडित हिनं वैविध्यपूर्ण भूमिका साकारत रसिकांची मनं जिंकली आहेत. 'मी सिंधुताई सपकाळ' या सिनेमातील भूमिका असो किंवा मग '100 डेज' मालिकेतील ग्लॅमरस भूमिका असो प्रत्येक भूमिकेला तेजस्विनीनं न्याय दिला. संवेदनशील अभिनय, ग्लॅमरस अदा आणि सौंदर्य यामुळे तेजस्विनी रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे. अभिनेत्री असलेल्या तेजस्विनीने स्वतःचा फॅशन ब्रँडही लॉन्च केला. त्यामुळे अभिनेत्री ते उद्योजिका असा प्रवास तिने यशस्वीरित्या पार केला आहे. Also Read: तेजस्विनी पंडित कोणत्या गोष्टीमुळे झाली आहे अस्वस्थ, वेगळ्याच अंदाजात व्यक्त केली मनातील तगमग!