‘...के दिल अभी भरा नहीं’ मध्ये नवीन कलाकारांची एंट्री ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2016 15:36 IST
सुयोग परिवार प्रस्तुत आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘...के दिल अभी भरा नहीं’ या नाटकात अभिनेते विक्रम ...
‘...के दिल अभी भरा नहीं’ मध्ये नवीन कलाकारांची एंट्री ?
सुयोग परिवार प्रस्तुत आणि मंगेश कदम दिग्दर्शित ‘...के दिल अभी भरा नहीं’ या नाटकात अभिनेते विक्रम गोखले आणि अभिनेत्री रिमा लागू यांचा प्रमुख अभिनय होता. आता काही कारणास्तव या नाटकातील कलाकार बदलणार आहेत. विक्रम गोखले यांना स्वरयंत्राचा त्रास झाला होता त्यामुळे हे नाटक बंद झाले होते. या नाटकाचे ७० हून अधिक प्रयोग झाले होते आणि प्रेक्षकांचा या नाटकाला प्रतिसाद पण सकारात्मक होता. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या नाटकाचे पुढेही प्रयोग चालू राहावेत असं विक्रम गोखले आणि रिमा लागू यांनी व्यक्त केलं.