Join us
Daily Top 2Weekly Top 5

'प्रत्येक वेळी स्वतःला...', तेजश्री प्रधाननं सांगितला सुखी जीवनाचा मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 19:28 IST

Tejashree Pradhan : नुकतेच तेजश्री प्रधान हिने सुखी जीवनाचा मंत्र शेअर केला. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

होणार सून मी या घरची या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान (Tejashree Pradhan) ओळखली जाते. चेहऱ्यावर सुंदर हास्य आणि सुंदर अभिनयामुळे तेजश्री कायमच चर्चेत असते. नुकतेच तेजश्री प्रधान हिने सुखी जीवनाचा मंत्र शेअर केला. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.

अभिनेत्री तेजश्री प्रधान सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. सोशल मीडियावर ती नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते आणि या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. या फोटोला दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःला सुधारण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही केलेल्या कामाचा आनंद घ्या, सुखी जीवन. तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

तेजश्री प्रधान मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नाटक, मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.  अल्पावधीत तिने तिचा स्वतंत्र असा चाहतावर्ग निर्माण केला आहे. तेजश्री प्रधान शेवटची अग्गंबाई सूनबाई मालिकेत पाहायला मिळाली होती. ही मालिका संपल्यानंतर बराच काळ सिनेइंडस्ट्रीपासून लांब होती. मात्र आता नुकतेच तिने एका चित्रपटाचे शूटिंग लंडनमध्ये केले आहे. यात तिच्यासोबत अजिंक्य देव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :तेजश्री प्रधान