मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री नेहा पेंडसे नुकतीच लग्नबेडीत अडकली. त्यानंतर आज अभिनेत्री मानसी नाईक हिने तिच्या प्रेमाची कबूली देत बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर केला. त्यानंतर आता एका वेबसाईटच्या वृत्तानुसार, मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीदेखील लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार असून ती कुणाल बेनोडेकर नामक तरूणासोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे म्हटलं आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ती रिलेशनशीपमध्ये असल्याचे एका मुलाखतीत सांगितलं होतं. मात्र तिने त्या व्यक्तीबद्दल कधीच सांगितले नव्हते. मात्र पिपिंगमूनच्या रिपोर्टनुसार, सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधूनच या गोष्टीचा इशारा देखील दिला आहे.
सोनाली सध्या परदेशात आहे आणि विविध एडवेंचर स्पोर्ट्सही करत आहे. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओतून रिलेशनशीपचा खुलासा केला आहे.
याबाबत सोनाली कधी उघडपणे बोलते हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.