Join us

'या' कठिण काळातही व्हेंटिलेटरची घोडदौड कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2016 16:22 IST

सध्या देशात सर्वात चर्चेचा विषय बनला तो चलनातून रद्द करण्यात आलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा. पाचशे आणि हजाराच्या नोटा ...

सध्या देशात सर्वात चर्चेचा विषय बनला तो चलनातून रद्द करण्यात आलेल्या हजार आणि पाचशेच्या नोटा. पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळे  सगळीकडचे व्यवहार थंड झालेत. पण याचा परिणाम व्हेंटिलेटर या चित्रपटावर झालेला दिसत नसल्याचे पाहायला मिळत आहेत. कारण या चित्रपटाने तब्बल अकरा दिवसांमध्ये अकरा कोटीचा आकडा पार केला आहे. तसेच पहिल्याच आठवडयात बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केल्यामुळे सगळीकडे या चित्रपटाची चर्चा आहे. तसेच या चित्रपटाने दुसया आठवड्यातही आपली घोडदौड कायम ठेवली. काही ठिकाणी सिंगल स्क्रिन चित्रपटगृहात थोडासा परिणाम झाला आहे. पण त्याची कसर मल्टीप्लेक्समध्ये भरुन काढली आहे. ऑनलाईन बुकिंग, नेट बँकिंग आणि प्लास्टिक मनी या सारख्या पयार्यांचा वापर करुन प्रेक्षक चित्रपटाचा आनंद घेत आहेत हे विशेष. बाप मुलाच्या नात्यावर आधारित हा चित्रपट अनेक कुटुंबातील वडील - मुलामध्ये संवादाचा दुवा बनत आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी मुंबईसह ठाणे, डोंबिवली, नाशिक, पुणे, अलिबाग अशा विविध शहरातील चित्रपटगृहांना भेटी दिल्या. या सर्व भेटीत त्यांना प्रेक्षकांच्या अतिशय भावूक प्रतिक्रिया मिळत आहेत. राजेश मापुसकर दिग्दर्शित या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, सतीश आळेकर, जितेंद्र जोशी, सुकन्या कुलकर्णी, सुलभा आर्या आदि कलाकारांचा समावेश आहे. तसेच या चित्रपटाची निर्मिती प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधु चोप्रा यांच्या पर्पल पेबल्सने केली असून मॅगीज पिक्चर्सने सहनिर्मिती केली आहे.