Join us
Daily Top 2Weekly Top 5

मैत्रीची मजा न्यारी, मित्रांसोबत पुन्हा बघा 'दुनियादारी'! ११ वर्षांनी 'या' थिएटरमध्ये पुन्हा रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2024 13:22 IST

११ वर्षांनी स्वप्नील जोशी, अंकुश चौधरीचा गाजलेला 'दुनियादारी' सिनेमा रिलीज झालाय. कुठे बघता येईल? जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा

'दुनियादारी' सिनेमा सर्वांच्या लक्षात असेलच. 'इस्टमनकलर लव्हस्टोरी' अशी टॅगलाईन असलेला 'दुनियादारी' हा सिनेमा आजही प्रेक्षक आवडीने पाहतात. स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर, उर्मिला कोठारे कानेटकर  अशा सर्वच कलाकारांची केमिस्ट्री आणि त्यांची सिनेमातली लव्हस्टोरी प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. ज्यांना थिएटरमध्ये 'दुनियादारी' पाहता आला नाही, त्यांना हा सिनेमा थिएटरमध्ये पुन्हा पाहण्याची संधी  मिळणार आहे. ११ वर्षांनंतर 'दुनियादारी' थिएटरमध्ये पुन्हा रिलीज झालाय.

'दुनियादारी' ११ वर्षांनंतर पुन्हा रिलीज! अंकुश चौधरीने दिली आनंदाची बातमी

तर वाचकांनो.. 'दुनियादारी' ११ वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये रिलीज झालाय. 'दुनियादारी' मधला दिग्या अर्थात अभिनेता अंकुश चौधरीने ही खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत सर्वांना ही खास बातमी सांगितलीय. मुंबई, पुणे, भिवंडी, कांदिवली, घाटकोपर, आकुर्डी  अशा भागांमधील काही निवडक थिएटरमध्ये 'दुनियादारी' पुन्हा रिलीज झालाय. त्यामुळे प्रेक्षकांना मित्रांसोबत हा खास सिनेमा पाहता येईल.

'दुनियादारी' सिनेमाविषयी...

'दुनियादारी' हा सिनेमा संजय जाधव यांनी दिग्दर्शित केला आहे. 2013 साली हा सिनेमा रिलीज झालेला. सिनेमातील सर्वच कलाकार पुढे लोकप्रिय झाले. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली. 'दुनियादारी' सिनेमाची कथा, गाणी चांगलीच गाजली. आजही 'टिकटिक वाजते डोक्यात', 'जिंदगी जिंदगी' ही गाणी लोकांच्या प्लेलिस्टमध्ये असतील यात शंका नाही.

टॅग्स :स्वप्निल जोशीअंकुश चौधरीसई ताम्हणकरउर्मिला कानेटकर कोठारेसंजय जाधव