Join us

या कारणामुळे झाला सई ताम्हणकरला आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2018 19:14 IST

सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे, वजनदार यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज ...

सई ताम्हणकरने दुनियादारी, बालक पालक, नो एंट्री पुढे धोका आहे, वजनदार यांसारख्या चित्रपटांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. आज मराठी इंडस्ट्रीतील एक आघाडीची अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिले जाते. तिने मराठी चित्रपटांसोबतच गजनी, हंटर यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. हंटर या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर ती आता दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली आहे. लवकरच ती सोलो या दाक्षिणात्य चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट मल्याळम आणि तामिळ या दोन्ही भाषांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणात सई सध्या व्यग्र आहे. हा एक रोमँटिक थ्रिलर चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन बिजोय नामदार यांनी केले आहे तर डलकर सलमानची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. त्याचसोबत डिनो मोरिया, नेहा शर्मा हे बॉलिवूडमधील कलाकार देखील या चित्रपटात झळकणार आहेत. सईने आज अभिनयक्षेत्रात चांगलेच यश मिळवले आहे. करोडोहून अधिक तिचे फॅन्स आहेत.सईच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या राक्षस या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. सईने तिच्या करियरमध्ये चांगलीच प्रगती केली आहे. सईला तिच्या व्यवसायिक आयुष्यात मिळत असलेल्या यशामुळे ती चांगलीच खूश आहे. पण त्याचसोबत ती खूश असण्यामागे आणखी एक कारण आहे. ती सध्या चांगलीच खूश का आहे याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना सांगितले आहे. ती कुत्र्यांच्या पिल्लांच्या प्रेमात पडली आहे. या पिल्लांसोबतचा फोटो सईने पोस्ट केला आहे. एका फोटोत तर सईच्या मांडीवर तिने कुत्र्यांची तीन पिल्ले घेतली असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या कुत्र्यांना पाहून सईला झालेला आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. सई या कुत्र्यांच्या पिल्लांच्या प्रेमात इतकी प्रेमात पडली आहे की, या पिल्लांना किस देखील करताना ती दिसत आहे. सईच्या या फोटोंना तिच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.