स्वप्नीलने केले लॉस्ट अॅण्ड फाऊंडचे कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2016 13:26 IST
आयुष्यात खूप धावपळ, गर्दी, माणसं, गोष्टी, टेक्नोलॉजी, सोयी-सुविधा पण तरी ही माणूस कोठेतरी जास्तीत जास्त एकटा पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचबरोबर नवे तंत्रज्ञान, नवीन सोशलवेबसाइटस या गोष्टींचा फायदा जरी होत असला तरी नुकसान देखील होत असल्याचे अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशलमिडीयावर अपडेट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे.
स्वप्नीलने केले लॉस्ट अॅण्ड फाऊंडचे कौतुक
Exculsive - बेनझीर जमादारआयुष्यात खूप धावपळ, गर्दी, माणसं, गोष्टी, टेक्नोलॉजी, सोयी-सुविधा पण तरी ही माणूस कोठेतरी जास्तीत जास्त एकटा पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्याचबरोबर नवे तंत्रज्ञान, नवीन सोशलवेबसाइटस या गोष्टींचा फायदा जरी होत असला तरी नुकसान देखील होत असल्याचे अभिनेता स्वप्नील जोशी याने सोशलमिडीयावर अपडेट केलेल्या व्हिडीओमध्ये सांगितले आहे. स्वप्नील म्हणाला,एकटेपणा या गोष्टीला प्रत्येक व्यक्तीला तोंड दयावे लागते. मला ही या एकटेपणाला तोंड दयावे लागले आहे. दोन ते तीन वषार्पूवीर्ची ही गोष्ट आहे. माझ्या आयुष्यात खूप एकटेपणा जाणवत होता. ही गोष्ट व्यावसायिकतेशी संबंधित नसून वैयक्तिक जीवनाशी होती. त्यावेळी माझा आत्मविश्वास पूर्णपणे डगमगला होता. तेव्हा फॅमिली व मित्रांनी माझ्याशी बोलून माझा हा एकटेपणा दूर करण्यास खूप मदत केली. याच एकटेपणावर आधारित असलेला लॉस्ट अॅण्ड फाऊंड हा चित्रपट आहे. या चित्रपटात सुंदर कल्पना, कास्ट, टेक्नीशियन्स जोडले गेले आहेत. त्यामुळे हा चित्रपट तुमच्यातला एकटेपणा दूर करण्यास नक्कीच मदत करेल. त्याचबरोबर जगण्यास देखील प्रेरणा देणारा लास्ट अॅण्ड फाऊंड हा चित्रपट नक्कीच पाहा.