Join us

"अंगावर काटा, डोळ्यात पाणी.."; भारताने कसोटी मालिका बरोबरीत सोडवल्यावर डॉ. सलील कुलकर्णींची भावुक प्रतिक्रिया

By देवेंद्र जाधव | Updated: August 4, 2025 17:41 IST

भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका टाय केल्यानंतर संगीतकार-दिग्दर्शक डॉ. सलील कुलकर्णींनी एक व्हिडीओ शेअर केलाय. जो चर्चेत आहे

आज समस्त भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाचा दिवस. भारतानेइंग्लंडविरुद्धची टेस्ट सीरिज २-२ ने बरोबरीत सोडवली. आज भारताने सहा धावांनी इंग्लंडविरुद्ध विजय मिळवला.  आणि अशक्य वाटणारा विजय मिळवला. यामुळे सर्व क्रिकेटप्रेमींना चांगलाच आनंद झाला. अनेक सेलिब्रिटीही भारताच्या यंग ब्रिगेडला टेस्ट सीरिजसाठी समोर्ट करत होते. अशातच डॉ. सलील कुलकर्णींनी भारताने सामना जिंकल्यावर आणि टेस्ट सीरिज बरोबरीत सोडवल्यावर सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया दिली आहे.

सलील कुलकर्णी भावुक, म्हणाले...

सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला. ते म्हणाले, "मित्रांनो! मित्रांनो! इंडिया काय जिंकलीये. काय सीरिज लेव्हल केलीय. किती अभिनंदन करावं. हे बघा, डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतोय. मोहम्मद सिराज हा काय बॉलर आहे आणि क्रिकेट हा काय गेम आहे. काय सीरिज झालीये यार! आपण सर्व जे क्रिकेटवेडे आहोत ना त्यांच्यासाठी ही पर्वणी होती. हा महोत्सव होता. काय स्पीरिट आहे बघा, क्रिस वोक्स एक हात दुखत असून आला होता आणि पळत होता. रिषभ पंत पाय फ्रॅक्चर असून खेळलाय यार. किती गोष्टी घेण्यासारख्या आहेत."

"मोहम्मद सिराजचं स्पिरीट यार, जेव्हा त्याने काल कॅच सोडला तेव्हा त्याचा चेहरा बघवत नव्हता. जेवण गेलं नाही यार मला काय होणार याचा विचार करुन... आज सकाळी ३५ या आकड्याला बोर्डात जेवढं महत्व असतं ना त्याच्यापेक्षा जास्त महत्व ३५ रन्सला आलं होतं. आणि आज आपण जिंकलोय. मला आणि माझ्यासारख्या अनेक क्रिकेटवेड्यांना आशा होतीच की आपण जिंकणार. काय खेळलेत यार! गिल, के. एल. राहुल. वॉशिंगटन सुंदर, जड्डू, आकाशदीप, प्रसिद्ध कृष्णा लव्ह यू! तुम्ही करुन दाखवलंत.. जबरदस्त!" 

टॅग्स :सलील कुलकर्णीभारतइंग्लंडभारताचा इंग्लंड दौरा २०२५