Join us

​डॉ. अमोल कोल्हेचे नवे नाटक अर्धसत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 16:05 IST

​डॉ. अमोल कोल्हेचे नवे नाटक लवकरच रंगभूमीवर दाखल होणार आहे. या नाटकाचे नाव अर्धसत्य असूनया नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी करणार आहेत.

डॉ. अमोल कोल्हेने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये, नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. पण त्याची खरी ओळख ही राजा शिवछत्रपती या मालिकेमुळे आहे. या मालिकेत तो शिवरायांच्या भूमिकेत पाहायला मिळाला होता. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. आता तो प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे.अमोलने आतापर्यंत चित्रपट, मालिका आणि नाटक या तिन्ही माध्यमांमध्ये काम केले आहे. शंभूराजे, बंध मुक्त यांसारखी त्याची अनेक नाटकं गाजली आहेत.आता तो पुन्हा एकदा रंगमंचावर काम करण्यास सज्ज झाला आहे. त्याचे अर्धसत्य हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या नाटकात तो मुख्य भूमिकेत असणार आहे. प्रसाद दाणी यांची कथा असलेल्या अर्धसत्य या नाटकाची तालीम सध्या जोरात सुरू आहे. या नाटकाचे दिग्दर्शन कुमार सोहोनी करणार आहेत तर या नाटकाची निर्मिती ही मुकेश शिपुरकर यांची आहे. या नाटकात अमोल कोल्हे एका पोलिसाच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय. त्याच्यासोबत या नाटकात प्रसाद दाणी, गौरीश शिपुरकर, दीपक करंजीकर आणि सरिता मेहेंदळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. अर्धसत्य या नाटकाद्वारे एक नवा विषय हाताळला जाणार असल्याचे म्हटले जात आहे. हे नाटक लवकरच रंगमंचावर दाखल होणार आहे.अर्धसत्य या नाटकाचा पहिला लूक नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या नाटकाचा पहिला लूक डॉ.अमोल कोल्हेने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. अमोलने या नाटकाच्या व्हिडीओचा पहिला लूक शेअर केल्यापासून तीन हजारांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. Also Read : राजा शिवछत्रपती येणार पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला