Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुठल्याच अभिनेत्रीसोबत डान्स करायचा नाही', अंशुमन विचारेच्या लेकीने त्याला दिली सक्त ताकीद, पहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 19:12 IST

अंशुमन विचारेच्या लेकीचा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

बॉलिवूडमधील स्टारकिड प्रमाणेच मराठी चित्रपटसृष्टीतील स्टारकिडदेखील चर्चेत असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अंशुमन विचारेची लेक अन्वी बऱ्याचदा चर्चेत येत असते. सोशल मीडियावरील तिचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. नुकताच तिचा एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. या व्हिडीओत ती आपल्या वडिलांनी म्हणजेच अंशुमन विचारेने कोणत्या अभिनेत्रीसोबत डान्स करायचा नाही, असे दमदाटी करून सांगताना दिसते आहे.

अंशुमन विचारे सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा त्याची लेक अन्वीचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो. तिचे व्हिडीओ बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. नुकताच त्याने अन्वीसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहिले की, माझं काही खरं नाही, कुठल्याच हिरोईनसोबत डान्स करायचा नाही, असं अन्वीने बजावले आहे. फुल्ल राडे, माझी आई.

या व्हिडीओत अन्वी अंशुमनला ज्या अभिनेत्रीसोबत डान्स केला तिला व्हिडीओ कॉल लावायला सांगते आहे. त्यावर तिची आई मिश्किलपणे हसत माझ्याकडे नंबर नाही असे सांगते.

त्यात ती म्हणते की माझ्या बाबासोबत परत डान्स केला तर तिची धुलाई करेन. त्यावर आई म्हणाली की आपले बाबा कलाकार आहेत. तरीदेखील ती बाबासोबत डान्स नाही करायचे असे सांगते आहे. व्हिडीओ कॉल लावू शकत नाही तर तिच्या घरी जाऊयात, असे तिने हट्ट धरला आहे.

आईसोबत डान्स केला तर अन्वीला चालणार आहे. मात्र इतर कोणासोबत त्याने डान्स करायचा नाही असे ती सांगताना दिसते आहे. तिचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

टॅग्स :अंशुमन विचारे