‘क्राफ्टसमन आसोसिअसन ऑफ फिल्म’ निर्मित ‘हसले आधी कुणी’ हे नवे एक पात्री नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे प्रयोग लवकरच सुरू होणार आहेत.
‘क्राफ्टसमन आसोसिअसन ऑफ फिल्म, थेटर, टेलिव्हिजन’ व ‘आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघ’ यांच्या संयुक्त रित्या आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ‘हसले आधी कुणी’ या एकपात्री नाटकाचा मुहूर्त प्रसन्न संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपट व नाट्यक्षेत्रातील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते मुहुर्ताचा नारळ वाढविला गेला.
दारुच्या अतिप्राशनाचे होणारे दुष्परिणाम, शरीरस्वास्थ्याची होणारी हेळसांड, दारुमुळे कौटुंबिक व व्यावसायिक आयुष्यातील वाढणारे ताणतणाव याबाबत जनजागृती करणारे हे नाटक असून याचे दिग्दर्शन सचिन गायकवाड व लेखन प्रकाश राणे यांनी केले आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मुनिरभाई तांबोळी, फिल्म क्षेत्रातील दिग्दर्शक देवेंद्र सुपेकर, अभिनेते प्रकाश राणे, संगीत दिग्दर्शक समीर फटेरपेकर, दिग्दर्शक अजय डेविड, अभिनेते श्रीकांत कामत, प्रज्ञा भालेकर विचारे, दिग्दर्शक सचिन गायकवाड, सुरेखा, संजय, तनुजा, संजना आदी मान्यवर उपस्थित होते.