नात्यांचे छुपे बंध उकलणारी डॉक्युमेंट्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:36 IST
शहीन दिल-रियाज आणि त्याच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. मेयर सांगतात की, ‘आपले आईवडिल त्यांच्या आईवडिलांशी भांडताना आजही लहान मुलांसारखे ...
नात्यांचे छुपे बंध उकलणारी डॉक्युमेंट्री
शहीन दिल-रियाज आणि त्याच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. मेयर सांगतात की, ‘आपले आईवडिल त्यांच्या आईवडिलांशी भांडताना आजही लहान मुलांसारखे वागतात. म्हणजे आपले भूतकाळातील वर्तन कधीच संपूर्णपणे नाहिसे होत नाही. म्हणजे आपला भूतकाळ पाठीवर घेऊनच आपण जगत असतो. आपल्या कुटुंबाशी जोडलेल्या आठवणी आणि बंध कधीच जुन्या किंवा कमी महत्त्वाच्या होत नाहीत. परंतु, जर कुटुंबातील सदस्य दुसºया खंडात राहत असतील, त्यांची भाषा वेगळी असतील, चाली-रीती भिन्न असतील तर काय? हा दुरावा त्यांना आणखी दूर नेईल की आणखी जवळ घेऊन येईल? अशा प्रश्नांचे उत्तर कॉरिने मेयर यांनी ‘पास्ट इज प्रेझेंट’ या डॉक्युमेंट्री-नाटकामधून शोधण्याचा प्रयत्न केला आहे. नुकताच याचा प्रयोग बेंगलुरूमध्ये झाला.शहीन दिल-रियाज आणि त्याच्या कुटुंबाची ही कहाणी आहे. मेयर सांगतात की, ‘आपले आईवडिल त्यांच्या आईवडिलांशी भांडताना आजही लहान मुलांसारखे वागतात. म्हणजे आपले भूतकाळातील वर्तन कधीच संपूर्णपणे नाहिसे होत नाही. म्हणजे आपला भूतकाळ पाठीवर घेऊनच आपण जगत असतो.’ चार वर्षांपूर्वी या प्रोजेक्टची सुरुवात झाली. शहीनला मेयर यांनी त्याच्या कुटुंबाविषयी पटकथा लिहिण्यास प्रवृत्त के ले. फोटो, रोजनिशीतील नोंदी, वर्तमान पत्राची कात्रणे आणि व्हिडियोच्या माध्यमातून ‘पास्ट इज प्रेझेंट’ रंगमंचावर वास्तव समोर मांडते. नाटकाचा हा नवा प्रकार आहे. आपल्या आयुष्याती खºयाखुºया अनुभवांना, गोष्टींना जशाच्या तसे मांडणे, त्याला फिक्शनची जोड न देणे याची काळजी घ्यावी लागते.