Join us
Daily Top 2Weekly Top 5

​सैराट फेम रिंकू राजगुरूचे खरे नाव तुम्हाला माहीत आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2017 14:49 IST

सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहोचले. पहिल्याच चित्रपटात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली आर्ची ही ...

सैराट या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हे नाव घराघरात पोहोचले. पहिल्याच चित्रपटात तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिने साकारलेली आर्ची ही भूमिका तर प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. या चित्रपटातील आर्ची आणि परशाची प्रेमकथा प्रेक्षकांना चांगलीच भावली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर लाखोने पैसे मिळवले आहे. सैराट हा मराठीतील सगळ्यात जास्त गल्ला जमवणारा चित्रपट ठरला आहे.या चित्रपटामुळे रिंकू राजगुरू हे नाव केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर प्रसिद्ध झाले आहे. सैराट या चित्रपटाचे कौतुक बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनीदेखील केले आहे. द कपिल शर्मा शो सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमातही सैराट या कार्यक्रमाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे, आकाश ठोसर, अजय-अतुल आणि रिंकूने हजेरी लावली होती.सैराट हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून रिंकू राजगुरू या नावाची भुरळ सगळ्यांना पडली आहे. प्रेक्षकांसाठी ती त्यांची रिंकू आहे. ते तिला रिंकू याच नावाने ओळखतात. पण तिचे खरे नाव रिंकू नसून तिचे रिंकू हे टोपण नाव आहे. रिंकू नुकतीच दहावीची परीक्षा 66.40 टक्के मिळवून पास झाली आहे. रिंकूच्या याच दहावीच्या निकालपत्रातून आपल्याला तिचे खरे नाव कळत आहे.रिंकूचे खरे नाव प्रेरणा असून रिंकू या नावाने तिला घरातले हाक मारतात. पण चित्रपटात येण्यासाठी तिने प्रेरणा या नावाला पसंती न देता रिंकू या नावाला पसंती दिली. त्यामुळे आज सगळे तिला रिंकू राजगुरू या नावानेच ओळखतात.रिंकू राजगुरूचे खरे नाव प्रेरणा राजगुरू आहे हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटले असेल.